देश विदेश

Crime News: महिला शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार, जिम ट्रेनरसह चार मित्रांचं भयानक कृत्य

Gurugram Crime News: गुरुग्राममधील एका खाजगी शाळेतील परदेशी भाषेच्या शिक्षिकेवर चार मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरण नोंदवले आणि चारही आरोपींना अटक केली आहे.

Dhanshri Shintre

  • गुरुग्राममधील खाजगी शाळेतील महिला शिक्षिकेवर चार मित्रांनी सामूहिक बलात्कार केला.

  • पीडितेने दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

  • आरोपी जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत होते; झुम्बा नृत्य शिकवत होते.

  • पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली.

गुरुग्राममधील एका प्रसिद्ध खाजगी शाळेतील परदेशी भाषेच्या महिला शिक्षिकेवर चार मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला कशीतरी स्वतःला सावरत घरी पोहोचली. गुरुवारी महिला ठाणे पूर्व येथे चारही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शुक्रवारी सर्व आरोपींना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत होते आणि झुम्बा नृत्य शिकवत होते.

पोलिस तपासानुसार, पीडित महिला आपल्या कुटुंबासोबत गुरुग्राममध्ये राहते. एका नामांकित खाजगी शाळेत परदेशी भाषा शिकवते. सप्टेंबर महिन्यात ती एका पार्टीत गौरव नावाच्या तरुणाशी ओळख झाल्यानंतर संपर्कात राहू लागली. १ ऑक्टोबरच्या पहाटे गौरवने तिला फोन करून भेटण्याचे सांगितले. गुरुग्रामच्या महिला ठाणे पूर्व परिसरात भेटल्यानंतर आपल्या मित्र नीरजच्या खोलीत नेले. तेथे पहाटे दोनच्या सुमारास गौरवने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर नीरजलाही बोलावून त्यानेही अत्याचार केला.

या दोघांनंतर त्यांनी त्यांच्या इतर दोन मित्रांना, अभिषेक आणि योगेशला, फोन करून बोलावले आणि त्यांनीही त्या शिक्षिकेवर बलात्कार केला. पीडितेने वारंवार सोडून देण्याची विनंती केली. परंतु कोणताही आरोपी थांबला नाही. महिला दुसऱ्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबर रोजी सकाळी घरी पोहोचली आणि त्याच दिवशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिस प्रवक्ते संदीप कुमार यांनी सांगितले की, चारही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांखाली गुन्हा दाखल केला. त्यांची ओळख पटली आहे. गौरव हा हिमाचल प्रदेशचा रहिवासी आहे. योगेश आणि अभिषेक हे नारनौलचे असून नीरज हा प्रयागराज, उत्तर प्रदेशचा आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT