Jammu Kashmir Latest News:  Saamtv
देश विदेश

Jammu-Kashmir Encounter: मोठी बातमी! जम्मू काश्मिरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद

Jammu Kashmir Latest News: डोडा जिल्ह्यातील देसा जंगल परिसरात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.

Pramod Subhash Jagtap

जम्मू काश्मिर|ता. १६ जुलै २०२४

गेल्या काही दिवसांपासून जम्मू- काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न दहशतवादी सातत्याने करत आहेत. डोडा जिल्ह्यातील देसा जंगल परिसरात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. जखमींना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवानांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडाच्या उत्तर भागात ही संयुक्त कारवाई करण्यात येत होती.

राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी सुमारे 7.45 वाजता देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त शोध मोहीम सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. रात्री ९ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांशी संपर्क झाला त्यानंतर जोरदार गोळीबार झाला. या भागात अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

जवळपास 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ चाललेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह चार लष्करी जवान आणि एक पोलिस जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यापैकी चार जवानांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT