Gujrat Sabarkantha Car- Truck Accident: Saamtv
देश विदेश

Gujrat Accident: चालकाचा डोळा लागला, भयंकर घडलं, सुसाट कार ट्रकमध्ये घुसली; ७ जण जागीच ठार| VIDEO

Gujrat Sabarkantha Car- Truck Accident: सुसाट कार थेट पाठीमागून ट्रकमध्ये घुसल्याने ही दुर्घटना झाली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असू एक जण गंभीर जखमी आहे.

Gangappa Pujari

गुजरात, ता. २५ सप्टेंबर

Gujrat Himmat Nagar Accident: गुजरातमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. गुजरातच्या हिम्मतनगरमध्ये बुधवारी (ता. २५ सप्टेंबर) सकाळी कार आणि ट्रकचा मोठा अपघात झाला. सुसाट कार थेट पाठीमागून ट्रकमध्ये घुसल्याने ही दुर्घटना झाली. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असू एक जण गंभीर जखमी आहे. अपघातातील जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून भयंकर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कार-ट्रकचा भयंकर अपघात

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरातमधील हिम्मत नगरमध्ये बुधवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. गुजरातच्या हिम्मतनगर येथे भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. अपघातावेळी कारचा वेग एवढा होता की कारचा अर्धा भाग ट्रकवर जाऊन आदळला. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या भयंकर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

७ जण जागीच ठार

कारमध्ये एकूण सात जण अहमदाबादकडे प्रवास करत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या ट्रेलरला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. गाडीचा वेग प्रचंड असल्याने कार थेट ट्रकमध्ये घुसली, ज्यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कार चालकाचा डोळा लागल्याने ही भयंकर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

पत्रा कापून मृतदेह बाहेर...

दरम्यान, अपघातावेळी कारचा वेग १२०च्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. धडक इतकी भयंकर होती ही कारचा अक्षरश: चुराडा झाला. कारचा प्रचंड वेग अन् जोराची धडक यामुळे गाडीचा पुढचा भाग ट्रकमध्ये घुसला होता. त्यामुळे पोलीस व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या कष्टाने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले. वाहनातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमी आणि मृतांची ओळख पटली असल्याचे त्यांनी सांगितले. मृतदेह आल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, पुढील काही दिवसांत महायुती फुटणार?, कुठे पडली ठिणगी?

शेवटच्या एका तासात खेळ खल्लास! शेअर बाजारात फुटला आपटीबॉम्ब, गुंतवणूकदारांच्या गटांगळ्या, 700,000 कोटींचा चुराडा

Shikhar Dhawan: हार्दिक पंड्यानंतर आणखी एका क्रिकेटरचा गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो व्हायरल; लवकरच दुसरं लग्न करणार

Maharashtra Live News Update: चाळीसगाव शहरात वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली

Satara Tourism : बोटीतून पाहा सह्याद्रीचे सुंदर नजारे, साताऱ्यात आहे 'हे' खास लोकेशन

SCROLL FOR NEXT