Vadodara car accident accused Rakshit Chaurasia CCTV footage Saam Tv News
देश विदेश

Vadodara Accident : आज गाडी तेरा भाई चलायेगा! नशेत ड्रायव्हिंग, तोंडात निकिताचं नाव, CCTVमध्ये रक्षितचे प्रताप उघड

Vadodara Car Crash CCTV : रक्षित आणि अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत असलेला मित्र प्रांशू हे त्यांच्या एका मित्राच्या घरी गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. रक्षितने नेमकं काय केलं ते एकदा पाहा.

Prashant Patil

गांधीनगर : गुजरातच्या वडोदरा शहरात मध्यरात्री एका बेफाम गाडी चालकानं पाच जणांना चिरडल्याची घटना घडली असून, यात एक महिला ठार झाली. वडोदरा शहरात कायदाचं शिक्षण करत असलेल्या २० वर्षीय तरुणाने भरधाव गाडी चालवत दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री, साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. यानंतर तीन दिवसांनी अपघाताच्या आधीचे क्षण दाखवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या दृश्यांवरुन आरोपी रक्षित चौरसिया याने मद्यपान केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

रक्षित आणि अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत असलेला मित्र प्रांशू हे त्यांच्या एका मित्राच्या घरी गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं. या जीवघेण्या अपघाताला कारणीभूत असलेली कारही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये रक्षित आणि त्याचा मित्र सुरेश स्कूटरवरून सुरेशच्या घरी जाताना दिसतात. आत जाण्यापूर्वी दोघे गप्पा मारत उभे असतात. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रक्षित हातात असलेल्या बाटलीतून काहीतरी पिताना दिसत आहे, मात्र बाटलीत नेमकं काय आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. त्याच ठिकाणी दुसऱ्या एका क्लिपमध्ये काळी गाडी घराजवळच पार्क होताना दिसते. त्यानंतर रक्षितचा मित्र प्रांशू घरात चालत येताना दिसतो.

रक्षित आणि प्रांशू यांनी गाडीत बसण्यापूर्वी सुमारे ४५ मिनिटं या ठिकाणी टाइमपास केल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला प्रांशू ड्रायव्हर सीटवर होता. मात्र, तिथून निघण्यापूर्वी रक्षितने त्याच्यासोबत जागा बदलली आणि स्टेअरिंग हाती घेतलं, तर प्रांशू बाजूच्या सीटवर गेला.

त्यानंतर रक्षितने भरधाव वेगात कार चालवत बडोदा येथे अनेक दुचाकींना धडक दिली, यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आणि इतर चार जण जखमी झाले. दारूच्या नशेत दिसणारा रक्षित गाडीतून उतरल्यानंतर 'अनदर राऊण्ड, अनदर राऊण्ड! निकिता मेरी..' असं ओरडताना ऐकू येत होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT