Gujarat High court  Saam TV
देश विदेश

High Court News: प्रग्नेंट असताना बायको समलिंगी मैत्रिणीकडे गेली, परत मिळवण्यासाठी नवरा कोर्टात धावला

Gujarat News: गुजरातमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रग्नेंट बायको समलिंगी मैत्रिणीकडे राहायला गेली त्यामुळे कोर्टात धाव घेतली. कोर्टाने देखील त्याची याचिका फेटाळून लावली. यामागचे कारण काय वाचा सविस्तर...

Priya More

अहमदाबाद येथे राहणाऱ्या एका तरुणाचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण लग्नानंतर काही दिवसांनी त्याला समजले की त्याची पत्नी लेस्बियन असून तिचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत. यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणं झाल्याचा दावा तरुणाने केला. यादरम्यान त्याचीपत्नीही गरोदर राहिली. भांडण झाल्यामुळे या तरुणाच्या पत्नीने तयाचे घर सोडले आणि ती तिच्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली.

वारंवार विनंती करूनही पत्नी परत न आल्याने तरुणाने गुजरात हायकोर्टात धाव घेतली. त्या तरुणाने कोर्टामध्ये हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आणि कोर्टाला त्याच्या पत्नीला घरी परत पाठवण्याची विनंती केली. पण न्यायाधीशांचा निर्णय ऐकून हा तरुण डोके धरून बसला. कोर्टाने त्याची ही याचिका फेटाळून लावली. या प्रकरणाचा निकाल देण्यापूर्वी कोर्टाने या तरुणाच्या पत्नीला कोर्टात हजर राहण्यास सांगितले.

महिलेने पतीकडे परत जाण्यास नकार दिला आणि तिला तिच्या मैत्रिणीसोबत राहायचे असल्याचे कोर्टात सांगितले. कोर्टाने तिला तिच्या इच्छेनुसार मैत्रिणीसोबत राहण्याची परवानगी दिली. न्यायमूर्ती आयजे व्होरा आणि न्यायमूर्ती एसव्ही पिंटो यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले की, आम्ही महिलेची इच्छा जाणून घेतली. या महिलेने आरोप केला आहे की तिचा पती तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करतो. त्यामुळे, तिने स्वेच्छेने आपले सासरचे घर सोडले आणि आपल्या मैत्रिणीसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे कैदेत ठेवते तेव्हा हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली जाते. या महिलेच्या मैत्रिणीने तिला बेकायदेशीर कैदेत ठेवले नसल्याचे कोर्टाने मान्य केले. त्यामुळे या महिलेला तिच्या इच्छेनुसार ताबडतोब मुक्त केले जाते. या महिलेच्या पतीचे असे म्हणणे होते की, त्याची पत्नी ऑक्टोबरमध्ये त्याला सोडून तिच्या मैत्रिणीसोबत राहायला गेली होती.

बायको लेस्बियन आहे. तिची आवड पुरुषांमध्ये नसून स्त्रियांमध्ये आहे. पत्नीच्या या कृत्याला कंटाळल्याचे देखी त्याने सांगितले. गर्भवती असूनही तिने आपल्या कथित लेस्बियन मैत्रिणीसोबत राहण्यासाठी घर सोडले आहे असे देखील त्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT