Wedding Viral Video Saam TV
देश विदेश

Wedding Viral Video: अरेच्चा! लग्नात झाला नोटांचा पाऊस; पैसे गोळा करण्यासाठी उडाली झुंबड

लग्नात चक्का ५०० च्या नोटांचा पाऊस झालेलं तुम्ही कधी पाहिलं आहे का?

Ruchika Jadhav

Wedding Funny Video: भारतात सर्वच ठिकाणी लग्नाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हिंदू, मुस्लीम, बौद्ध अशा सर्वच जाती धर्मातील लग्न त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लागतात. लग्न लागण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी आनंद तर सारखाच व्यक्त केला जातो. सर्वच लग्नांमध्ये डिजेचा चाल धरत सर्वजण थिरकत असतात. यामध्ये काही व्यक्ती पैशांची उधळण देखील करतात. (Latest Wedding video)

नवरदेव किंवा नवरीच्या अंगावर ओवाळून १०, २०, ५० जास्तीत जास्त १०० ची नोट ओवाळून टाकली जाते. अनेक लग्नांमध्ये हा प्रकार तुम्ही हमखास पाहिला असेल. मात्र लग्नात चक्का ५०० च्या नोटांचा पाऊस झालेलं तुम्ही कधी पाहिलं आहे का?

गुजरातमधील केकरी तालुक्यातील सेवडा अगोल गावातील ही घटना आहे. या गावात माजी सरपंच असलेल्या एका व्यक्तीच्या भाच्याचं लग्न आहे. या लग्नातला हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आलाय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की,नवरदेवाची वरात खाली आली आहे. वरातीला सर्व जण नाचत आनंद व्यक्त करत असतात. अशात कुटुंबातिल काही व्यक्ती गच्चीवर जातात आणि खाली नाचणाऱ्यांवर पैशांची उधळण करतात. बर ते काही हजार पाचशे नाही तर लाखो उपये उधळताना दिसत आहेत.

आकाशात सर्वत्र पैसे उडताना दिसत आहेत. त्यातील एका व्यक्तीच्या हातात तर ५०० रुपयांच्या नोटांची मोठी गड्डी आहे आणि तो व्यक्ती जराही न थांबता हे पैसे खाली उधळत आहे. तसेच खाली असलेली लहान मुलं आणि इतरही काही व्यक्ती हे पैसे गोळा करण्यासाठी एकमेकांवर तुटून पडलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT