Hardik Patel News in Marathi  SAAM TV
देश विदेश

Hardik Patel: भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर हार्दिक पटेल स्पष्टच बोलले, अद्याप...

काँग्रेसला रामराम केल्यानंतर हार्दिक पटेल भाजप किंवा आपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.

Nandkumar Joshi

अहमदाबाद: काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्ल्यानंतर युवा नेते हार्दिक पटेल भाजपमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या चर्चेला हार्दिक यांनी स्वतःच पूर्णविराम दिला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याविषयी त्यांनी आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलं. भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत आपण अद्याप निर्णय घेतला नाही, असं ते म्हणाले. हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत बुधवारी गुजरातच्या काँग्रेस कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते. पक्षाकडून गुजरातमध्ये केवळ जातीयवादाचा राजकारण होत असल्याचं ते म्हणाले होते.

काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्यानंतर हार्दिक पटेल हे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. मी माझ्या आयुष्यातील तीन वर्षे काँग्रेसमध्ये वाया घालवली. सध्या तरी भाजपमध्ये किंवा आम आदमी पक्षामध्ये जाण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. मी जो निर्णय घेईल तो प्रामाणिकपणे घेतलेला असेल, असेही हार्दिक पटेल यांनी स्पष्ट केले.

हार्दिक पटेल यांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी गुजरात काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष झालो, पण मला कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. काँग्रेस केवळ लोकांचा वापर करून घेतो. त्यानंतर त्यांना बाजूला केलं जातं. नरहरी अमीन, चिमनभाई पटेल यांना काँग्रेसमधून हटवण्यात आले. काँग्रेसमध्ये खरं बोलल्यावर त्यांची बदनामी केली जाते, असा आरोप हार्दिक यांनी केला.

हार्दिक पटेल यांनी या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधींवर त्यांची नाराजी होती असे बोलले जात आहे. पक्षात त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते, अशी चर्चा आहे. यावेळी त्यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधताना गंभीर आरोप केला. राहुल गांधी जेव्हा गुजरातला आले, त्यावेळी त्यांनी येथील समस्यांवर अवाक्षरही काढले नाही. राहुल गांधींसाठी पक्षाचे नेते चिकन सँडविच आणि डायट कोकची व्यवस्था करण्यात व्यग्र होते, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT