Gujarat Accident Saam Digital
देश विदेश

Accident News : दरड कोसळून ७ कामगारांचा मृत्यू, अजूनही काहीजण अडकल्याची भीती

Gujarat Accident News : गुजरातच्या मेहसाणामध्ये दरड कोसळून ७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही कामगार मलब्यात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

Sandeep Gawade

गुजरातच्या मेहसाणामध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून ७ कामगारांचा मृत्यू झाला असून अजूनही काही कामगार मलब्यात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. काही अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जासलपूरनजीक ही घटना घडली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मेहसाणा जिल्ह्यातील कडी तालुक्यातील जासलपूरनजीक एका बांधकाम सुरू असलेल्या कंपनीची भिंत बांधताना अचानक दरड कोसळली. तिथे काम करत असलेले अनेक कामगार या दरडीखाली अडकले. त्यात ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही काही कामगार मलब्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. घटनास्थळी ॲम्ब्युलन्स आणि पोलिस अधिकारीही पोहोचले आहेत.

जिल्हा विकास अधिकारी डॉ. हसरत जस्मीन यांनी सांगितलं की हा अपघात आज दुपारी अंदाजे 1:45 वाजता झाला. एका खासगी कंपनीचे बांधकाम सुरू होते. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार 9-10 लोक अडकले होते, त्यापैकी ७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर 19 वर्षीय तरुणाला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. अजूनही 2-3 लोक अडकलेले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने त्यांना मातीचा ढिगारा हटवून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT