Groom carrying bride Latest Viral News/Social Media SAAM TV
देश विदेश

Viral Video : भावानं नादच केला; नवरदेवानं नवरीला स्टेजवरच उचललं; पायऱ्यांवरून उतरताना पाय घसरला अन्...

Groom carrying bride Latest Viral News : लग्नाच्या सोहळ्यात असा काही किस्सा घडतो की नवरदेव आणि नवरीच्या तो आयुष्यभर लक्षात राहतो. असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Nandkumar Joshi

Groom carrying bride Latest Viral News : लग्नसोहळा म्हटलं की उत्साह आलाच. नवरदेव, नवरीमुलगी यांच्यासाठी तर प्रत्येक क्षण आयुष्यभर साठवून ठेवावा असाच. लग्नसोहळ्यात तर अनेक गंमती-जंमती घडतात.

म्यूझिक, डान्स आणि जेवणावळी हे सगळं आलंच. हा लग्नसोहळा आणि त्यातील क्षण कायम लक्षात राहावे यासाठी काहीतरी हटके करायचं असं एकतर नवरदेव किंवा नवरी मुलगी मनोमन ठरवते. पण हे सगळं करत असताना धम्माल काहीतरी घडतं आणि हा किस्सा आयुष्यभर लक्षात राहतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहीतरी हटके करायच्या नादात नवरदेव आणि नवरीमुलगी या दोघांचीही फजिती झाली. तरीही आता या नवरदेवाचं कौतुक होतंय.

नवरदेवानं नव्या नवरीला स्टेजवरच उचलून घेतलं. त्यानंतर तो स्टेजवरून खाली उतरायला लागला. पण काही कळायच्या आतच नवरदेवाचा पायरीवरून पाय घसरला. दोघेही पायऱ्यांवर पडले. पण नवरीमुलगी त्याच्या हातावरच होती, असं या व्हिडिओत बघायला मिळतं.

आता लग्नसोहळ्यातच नवरदेवाचा पाय घसरला म्हटलं तर चर्चा होणारच ना... पण झालेल्या फजितीवरही नवरदेवानं त्यावर मात केली. नवरदेवानं एक झक्कास स्माइल दिली अन् नवऱ्यामुलीला किस केलं. नवरदेवाच्या या रोमँटिक कृतीमुळं नेटकऱ्यांची मनं त्यानं जिंकली. हा व्हिडिओ बघणाऱ्या नेटकऱ्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी प्रेमवर्षाव केला आहे. नवरदेवानं सन्मानही राखला अन् किती प्रेमानं त्यानं सांभाळलं, असं एका यूजरनं म्हटलं. तो पडला पण त्यानं आपल्या हातावर उचलून धरली अन् प्रेमानं किस केला. पण पुढच्या वेळी काळजी घ्याल, अशी भन्नाट प्रतिक्रिया एका यूजरनं दिली.

(हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT