Chief Economic Advisor Saam Tv
देश विदेश

Chief Economic Advisor: डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन नवे मुख्य आर्थिक सल्लागार, जाणून घ्या त्यांच्याबाबत...

अर्थसंकल्पापूर्वी देशाला नवे मुख्य आर्थिक सल्लागार मिळाले आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी देशाला नवे मुख्य आर्थिक सल्लागार मिळाले आहेत. सरकारने डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. आज (22 जानेवारी 2022) त्यांनी पदभार स्वीकारला. या नियुक्तीपूर्वी डॉ. नागेश्वरन यांनी लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून काम केले आहे (Government appoints Dr V. Anantha Nageswaran as the Chief Economic Advisor For Union Finance Ministry).

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन (Dr V. Anantha Nageswaran) यांनी भारत (India) आणि सिंगापूरमधील अनेक बिझनेस स्कूल आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये शिकवले आहे. त्याचबरोबर त्यांची पुस्तकेही विपुल प्रमाणात प्रकाशित झाली आहेत.

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन हे IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन आहेत. ते क्रे युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्राचे प्रतिष्ठित व्हिजिटिंग प्रोफेसर देखील होते. त्यांनी 2019 ते 2021 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे पार्ट टाईम सदस्य म्हणून देखील काम पाहिलंय. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून पीजी डिप्लोमा इन मॅनेजमेंट केले आहे. त्याचवेळी, त्यांनी एमहर्स्टमधील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी देखील घेतली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT