LPG cylinders and electricity free  Saam TV
देश विदेश

Good News: ५०० रुपयांना LPG सिलिंडर, २०० युनिटपर्यंत मिळणार मोफत वीज; गरीबांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Telangana Government News: महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Satish Daud

Telangana CM Revanth Reddy News

गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईत मोठी वाढ झाली आहे. गॅस सिलिंडर तसेच इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. दरम्यान, महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकार गरीबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा देणार आहेत. येत्या २७ फेब्रुवारीपासून या दोन योजना राज्यात सुरू केल्या जाईल, अशी घोषणा तेलंगणाचे (Telangana Government) मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) केली आहे.

या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी देखील उपस्थित राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील मेदारम येथे आदिवासी उत्सवादरम्यान मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देवी-देवतांची पूजा केली. यानंतर त्यांनी राज्यातील जनतेसाठी काँग्रेस सरकार दोन मोठे निर्णय घेणार असल्याचं माध्यमांना सांगितलं. (Latest Marathi News)

"आम्ही निवडणूक प्रचारात तेलंगणातील जनतेला ६ आश्वासने दिली होती. यापैकी २७ फेब्रुवारीला आम्ही दोन आश्वासने पूर्ण करणार असून पांढरे शिधापत्रिकाधारकांना ५०० रुपयांचा एलपीजी सिलिंडर आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा सुरू केला जाईल", असं मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले.

"राज्य सरकारने याआधीच दोन आश्वासने पूर्ण केली असून, ज्यात महिलांसाठी सरकारी बसमध्ये मोफत प्रवास आणि गरिबांसाठी १० लाख रुपयांची आरोग्य योजना समाविष्ट आहे. ज्या दोन लाख रिक्त नोकऱ्या भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते, त्यापैकी 25 हजार पदे सरकारने भरली आहेत, अशी माहिती देखील मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT