Gold Silver Price Today Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price Today : खरेदीदारांसाठी सुर्वण संधी ! सोन्याचे भाव नरमले, तपासा आजचे दर

Gold-Silver Price In Maharashtra : अक्षय्य तृतीया, ईदच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती.

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. या महिन्यात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत.

अक्षय्य तृतीया, ईदच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती. ऐन लग्नसराई व मुहूर्तांवर सोनं (Gold) खरेदी करणे खरेतर कठीणच झाले आहे.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,720 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,790 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 769 रूपये आहे. (Gold Silver Price update 24 April 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,150 रुपये

दिल्ली - 60,940 रुपये

हैदराबाद - 60,790 रुपये

कोलकत्ता -60,790 रुपये

लखनऊ - 60,940 रुपये

मुंबई (Mumbai) - 60,790 रुपये

पुणे (Pune) - 60,790 रुपये

2. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत

वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉलर गेल्या सत्रातील सर्वोच्च शिखरावर गेल्याने मंगळवारी सोने मुख्य $2,000 च्या वर चढले, तर व्यापार्‍यांनी भविष्यातील व्याजदर वाढीच्या संकेतांसाठी बुधवारच्या यूएस चलनवाढीच्या डेटाचा विचार केला.

स्पॉट गोल्ड 0.8 टक्क्यांनी वाढून $2,005.79 प्रति औंस झाले तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.8 टक्क्यांनी वाढून $2,019.00 वर स्थिरावले.

3. हॉलमार्कचे (Hallmark)सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT