Goa Politics  Saam Tv
देश विदेश

Goa Politics: गोव्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचे 8 आमदार भाजपात प्रवेश करणार?

काँग्रेसमधील आमदार फोडण्यात भाजपला यश आल्याच्या चर्चांना उधान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिनेश केळुस्कर

Goa Politics: गोव्यात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसू शकतो कारण काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे गोवा (Goa) प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे.

गोव्यात विधानसभेच्या 40 जागा असून या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणुका झाल्या होत्या. राज्यात भाजपचे २५ आमदार आहेत, तर काँग्रेसचे ११ आमदार आहेत. त्या 11 आमदारांपैकी 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपने केला आहे.

हे देखील पाहा -

यामध्ये दिगंबर कामत, मायकेल लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प अमनोकर, अलेक्सिओ सिक्वेरा, रुडॉल्फ फर्नांडिस यांचा समावेश आहे. देशभरात काँग्रेसकडून भारत जोडो यात्रा सुरू असताना दुसरीकडे भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. भाजपात सामिल होणाऱ्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. दिगंबर कामत हे काँग्रेसचे गोव्यातील महत्त्वाचे नेते समजले जातात.

अद्याप या भाजपप्रवेशाबाबत कोणत्याही आमदाराकडून अधिकृतपणे दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र आज किंवा उद्या हे आठही आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

SCROLL FOR NEXT