Goa Crime Saam Tv
देश विदेश

संतापजनक! गोवा फिरण्यासाठी आलेल्या ब्रिटीश महिलेवर बलात्कार; आरोपी अटकेत

पीडिता आणि तिचा पती गोवा पर्यटनासाठी आले होते.

साम टिव्ही ब्युरो

पणजी : देशात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोव्यात एका 42 वर्षीय ब्रिटीश महिला पर्यटकावर बलात्कार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी सोमवारी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना उत्तर गोव्यातील अरंबोल बीच परिरात घडली आहे. (Goa British Women Rape Case)

जोएल व्हिन्सेंट डिसूझा (वय 32) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि तिचा पती गोवा पर्यटनासाठी आले होते. गुरूवारी ते उत्तर गोव्यातील अरंबोल बीच परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी स्थानिक रहिवासी असलेल्या जोएल डिसूझा या आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

घडलेल्या प्रकारानंतर पीडित ब्रिटिश महिलेने सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून डीवायएसपी सिद्धांत शिरोडकर यांच्यासह गोवा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

दरम्यान, गोव्यात परदेशी पर्यटकावर बलात्काराची ही पहिलीच घटना नाही. याआधी 12 मे रोजीही अशीच एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये एका रशियन अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप झाला होता. 12 वर्षीय तरुणी कुटुंबासह गोव्याला फिरायला आली होती. हे कुटुंब आरंबोल बीचजवळील एका रिसॉर्टमध्ये थांबले होते.

मुलीचे आई-वडील तिला रिसॉर्टवर सोडून बाजारात गेले होते. मुलगी एकटी असल्याचे पाहून रूम अटेंडंटने आधी स्विमिंग पूल आणि नंतर रिसॉर्टच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला. गोवा पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून अटक केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: मोदी सरकार बेरोजगारांना २,५०० रुपये देणार? काय आहे केंद्राच्या योजनेचं सत्य?

वयाची तिशी गाठलेल्यांनाही होतोय डायबिटीज; 'ही' 5 लक्षणं दिसताच करा चेकअप

Made in Pakistan Cosmetics: पाकच्या सौंदर्यप्रसाधनांचा राज्यात सुळसुळाट; ‘गोरी ब्युटी क्रीम’चं संगमनेर कनेक्शन

Pakistan Blast: शांतता रॅलीदरम्यान मोठा स्फोट; ७ जण ठार, १८ जखमी

'सर्वच क्षेत्रात वजन कमी, येणारा काळ आपलाच, आम्हाला बोलता न येणारी खाती मिळाली, मुंडे भाऊ-बहिणीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT