गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारीला सुरुवात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून विशेष निरीक्षकांची नियुक्ती
महाराष्ट्रातील पाच नेत्यांवर गोवा निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी
डिलिमिटेशनवरून दिल्लीत सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. केंद्र सरकारनं त्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. लोकसभेचं कामकाज ३० नोव्हेंबर रोजी, तर राज्यसभेचं कामकाज २ डिसेंबरला सुरू होणार आहे. सरकारच्या या विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीनं रणनीती आखलीय. दुसरीकडे काँग्रेसच्या हायकमांडनं गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय.
गोव्याच्या विजयासाठी काँग्रेसनं महाराष्ट्र्रातील नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवलीय. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून काँग्रेसकडून विशेष निरीक्षकांची नियुक्ती केलीय. या संदर्भातील माहिती काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून देण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुनील केदार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, अमित देशमुख, विश्वजीत कदम या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवलीय. याबाबत काँग्रेसचे नेते के.सी.वेणुगोपाल यांच्याकडून ही घोषणा करण्यात आलीय.
“काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (२०२७) ‘एआयसीसी’ (AICC) विशेष निरीक्षकांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. हा आदेश त्वरित प्रभावाने लागू होईल”, असं काँग्रेसच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, INDIA आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेऊन डिलिमीटेशन विधेयकला विरोध करण्याचा निर्णय घेतलाय. मोदी सरकारला लोकशाही संपवून संपूर्ण सत्ता स्वतःच्या हातात घ्यायची आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. आता जागांची संख्या वाढवून 800 पारचा नारा दिला जातोय. या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्तेत राहायचे असल्याचा आरोप खरगे यांनी केला. विधेयकात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या हितांचा विचार करण्यात आलेला नाही, असं खरगे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.