Goa Assembly Election Results Saam Tv
देश विदेश

Goa Assembly Election Results 2022: गोव्यात भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार, 14 मार्चला शपथविधी - सूत्र

गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

वृत्तसंस्था

Goa Assembly Election Results 2022: गोवा विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सांखळी मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे आता गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्यात भाजप सध्या 19 जागांवर आघाडीवर आहे (Goa Assembly Election Results 2022 BJP Is About To Claim To Form Government).

दरम्यान, भाजप मगोपला सोबत घेणार असल्याची माहिती आहे. गोव्यातील भाजप नेते आज गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन राज्यात सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे वृत्त आहे. गोव्यात भाजप आजच सरकार स्थापनेचा दावा करु शकते. तर येत्या 14 मार्चला शपथविधीचा कार्यक्रम होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

"गोव्यात भाजप सरकार स्थापन करणार; आम्ही एमजीपी आणि अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊ", असे गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे, काँग्रेसचे नेतेही राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. बहुमत मिळवण्यासाठी काँग्रेस आणि आघाडी प्रयत्न करताना दिसणार आहेत.

गोव्यातील सर्व 40 विधानसभा जागांसाठी उपलब्ध महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) 5 जागांवर आघाडीवर आहे, तर अपक्ष उमेदवार 03 जागांवर आघाडीवर आहेत. त्याचवेळी, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) आणि आम आदमी पार्टी (AAP) या निवडणुकीत प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT