Viral News Saam tv
देश विदेश

Viral Note: 'विशाल, मला २६ एप्रिलच्या आधी पळवून ने, कारण...'; गर्लफ्रेंडचा १० रुपयांच्या नोटेवर बॉयफ्रेंडला मेसेज

Viral Note News: सोशल मीडियावर एक १० रुपयांची नोट प्रचंड व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होणार याचा नेम नाही. हे एक असं माध्यम आहे, ज्याद्वारे जगाच्या एका कोपऱ्यातील घटना दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचते. सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. मात्र, सोशल मीडियावर एक १० रुपयांची नोट प्रचंड व्हायरल होत आहे. या नोटेवर गर्लफ्रेंडने तिच्या बॉयफ्रेंडसाठी मजकूर लिहिला आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या १० रुपयांच्या नोटेवर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला विनंती केली आहे. गर्लफ्रेंडने 10 रुपयांच्या नोटेवर बॉयफ्रेंडसाठी लिहिलेल्या मेसेजवरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा संदेश शेअर करत आहेत.

गर्लफ्रेंडचा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयफ्रेंडपर्यंत पोहोचेल का? तिच्या मनातील भावना बॉयफ्रेंडपर्यंत पोहोचेल का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

कुसुम नावाच्या मुलीने दहा रूपयांच्या नोटेवर एक पत्र लिहिलं आहे. कुसुमने तिचा प्रियकर विशालसाठी लिहिलं होतं. त्या १० रुपयांच्या नोटेवर माझं लग्न 26 एप्रिलला आहे. माझ्या लग्नाच्या आधी मला पळवून घेऊन जा असा संदेश कुसुमने लिहिला होता. गर्लफ्रेंडचा मजकूर प्रचंड व्हायरल झाला आहे.

कुसुमचा संदेश लग्नाच्या काही दिवसाआधी विशालकडे पोहोचल काय? कुसुमचा मेसेजला विशाल काय उत्तर देईल? बॉयफ्रेंड कुसुमला तिच्या लग्नाआधी तिला पळवून नेणार का? असे नानाविविध प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. विशालला संदेश पाठवणारी कुसुम कोण अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Paint: नेल पेंट लावण्याचे 'हे' दुष्परिणाम माहितीये का?

Maharashtra Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update: सांगलीत १५ ऑगस्टला मटण, चिकन विक्रीवर बंदी

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT