Love Affair Latest News  SAAM TV
देश विदेश

अजब प्रेम कहाणी! गर्लफ्रेंड झाली नापास, प्रियकराने थेट शाळाच दिली पेटवून

प्रेमात पडलेली लोक काय करतील याच काही सांगता येत नाही.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: प्रेमात (Love) पडलेली लोक काय करतील याच काही सांगता येत नाही. आपल्या गर्लफ्रेंडसाठी मुल वाटेल ते करतात. तुम्ही आतापर्यंत पाहिले असेल वाटेल ते करुन तिच्यासाठी वस्तु खरेदी करुन गिफ्ट देणे, तसेच गर्लफ्रेंड जे सांगेल ते लगेच देणे, आपण आतापर्यंत अशी अनेक उदाहरणे पाहिली असतील. पण आता वेगळेच प्रकरण समोर आले आहे. आपल्या गर्लफ्रेंडसाठी प्रियकराने आख्खी शाळाच पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.

त्या प्रियकराची गर्लफ्रेंड शाळेतील परिक्षेत नापास झाली. हे त्याला समजताच त्याने आख्खी शाळाच पेटवून दिली आहे. या प्रकरणी त्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहिती अशी, तो प्रियकर आणि मुलगी गेल्या काही वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. तो मुलगा त्या मुलीवर खूप प्रेम करत होता. यादरम्यान त्या मुलीची परीक्षा सुरू होत्या. परीक्षेनंतर त्या मुलीची निकाल होती आला, तेव्हा ती मुलगी नापास झाली असल्याचे समोर आले. त्या मुलीने भितीने त्या मुलाला याची माहिती दिली नाही. यानंतर काही दिवसांनी त्या प्रियकराला या संदर्भात माहिती मिळाली. तेव्हा त्या मुलाला एवढा राग आला की, त्याने थेट शाळाचा पेटवून दिली.

त्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने शाळेला आग लावली. त्याने शाळेतील काददपत्रांना पहिल्यांदा आग लावली. तसेच जास्तीत जास्त साहित्य जळून खाक होईल अशी आग त्याने लावली. या आगीत शाळेतील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली.

या आगीची माहिती पोलिसांना (Police) मिळताच पोलिसांना त्या प्रियकराला अटक केली. मुलगी आणि मुलगा काही दिवसातच लग्न करणार होते, पण मुलगी नापास झाल्यामुळे लग्न पुन्हा एक वर्ष पुढे ढकलण्यात आले, या गोष्टीचा राग मनात धरुन त्या मुलाने थेट शाळाच पेटवून दिल्याचे तपासात पुढे आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कुणाच्या गळ्यात पडणार नगराध्यक्षपदाची माळ? VIDEO

Instant Idli Recipe : पीठ न आंबवता १० मिनिटांत बनवा मऊ-लुसलुशीत इडली, वाचा इन्स्टंट रेसिपी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा डंका? कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार?

Saam Maha Exit Poll : राज्यात भाजपच नंबर @1 ; राष्ट्रवादी, शिंदे सेनेला किती ठिकाणी सत्ता? ठाकरे-पवार गट, काँग्रेसची काय स्थिती?

Mumbai Water Cut : मुंबईवर ८७ तास पाणीसंकट! 'या' भागांतला पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT