Couple Romance Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : प्रेमीयुगुलाची गच्चीवर सुरू होती रासलीला; अचानक आई आली अन्...

गच्चीवर झोपलेल्या एका प्रेमीयुगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Satish Daud

Couple Romance Viral Video : तुम्हाला करण-अर्जुन या हिंदी चित्रपटातील एक गाणं आठवतं का? करण-अर्जुन चित्रपटातील 'छत पर सोया था बहनोई में तने समझ के सो गई' हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं होतं. आता तुम्ही म्हणाल, इतक्या दिवसानंतर या गाण्याची आठवण का? या गाण्याची आठवण करून देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  (Breaking Marathi News)

उन्हाळ्यात रात्रीत घरात प्रचंड गरमी लागत असल्याने अनेकजण गच्चीवर झोपणं पसंत करतात. शहरातील लोकं गच्चीवर झोपत नसले तरी, ग्रामीण भागातील लोकं अजूनही गच्चीवरच झोपणं पसंत करतात. अशातच, गच्चीवर झोपलेल्या एका प्रेमीयुगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हिडीओ (Viral Video) झाला आहे.

व्हिडिओत काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत गच्चीवर दोघेजण अंगावर पांघरून घेऊन झोपलेले दिसत आहे. ते अंथरूणात काहीतरी करताना दिसून येताहेत. अंथरूणामध्ये दुसरं तिसरं कुणी नसून एक प्रेमी युगुल आहे. या प्रेमीयुगुलाची रासलीला सुरू असताना, अचानक लाल रंगाची साडी नेसलेली एक महिला गच्चीवर येते.

प्रेमीयुगुलाच्या अंगावरील पांघरून काढून ती त्यांना मारहाण करण्यास सुरुवात करते. अचानक फटके पडायला सुरूवात झाल्यानंतर पांघरूणातून एक मुलगी हळूच बाहेर निघते आणि गच्चीवरून दुसऱ्या गच्चीवर निघून जाते.  (Latest Marathi News)

ही मुलगी गेल्यानंतरही महिला पांघरूनमध्ये झोपलेल्या मुलाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. भरदिवसा गच्चीवर प्रेमीयुगुलाची रासलीला पकडली गेल्याने अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT