धक्कादायक! आधी कबर खणायला लावली; नंतर गोळ्या झाडून पुरला तिचाच मृतदेह Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! आधी कबर खणायला लावली; नंतर गोळ्या झाडून पुरला तिचाच मृतदेह

अमांडा अल्बाच असे मृत तरुणीचे नाव आहे.

वृत्तसंस्था

ब्राझील- आधी तरुणीला तिची कबर खणायला लावली आणि त्यानतंर तिची हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार ब्राझीलमध्ये घडला आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या तरुणीला अंमली पदार्थ तस्करांनी धमकावून खड्डा खणायला लावला. त्यानंतर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली आहे. ही घटना ब्राझीलमधील सँटा कटरिना राज्यात घडली आहे. 21 वर्षीय अमांडा अल्बाच असे मृत तरुणीचे नाव आहे.

हे देखील पहा -

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार वाढदिवसाच्या पार्टीत काही गुंड प्रवृत्तीचे तरुण आले होते. हे सर्व संशयित एखाद्या मोठ्या ड्रग रॅकेटचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. \अमांडा अल्बाचने गुपचूप काही संशयितांचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले. एका संशयिताची नजर तिच्यावर पडली आणि त्यावर त्याने फोटो काढण्यास आक्षेप घेतला. त्यावेळी या संशयितांनी अमांडा अल्बाचला मारण्याचा कट रचला.

त्यानंतर पार्टी होऊन बराच काळ होऊन देखील अमांडा घरी परतली नव्हती. तिच्या कुटुंबीयांनी मोबाईलवर संपर्क साधला असता नंबर बंद होता. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांच्या तपासात एक संशयित अंमली पदार्थ विक्रेता त्यांच्या हाती लागला आणि त्याने अमांडा अल्बाचची हत्या केल्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीने संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. अमांडाची हत्या करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी तिला जबरदस्तीने धमकावून तिला कबर खोदायला लावली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. कबर खोदल्यानंतर संशयितांनी तिला गोळ्या घातल्या. त्यानंतर तिचा मृतदेह त्याच कबरीमध्ये पुरला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT