Funny Viral Dance Saam Tv
देश विदेश

Funny Dance: 'काला चष्मा'वर तरुणीचा कुत्र्यासमोर भन्नाट डान्स; Video पाहून हसू आवरणार नाही

हा व्हिडीओ पाहून कुणाला शोले चित्रपटातील ‘बसंती’ आठवत आहे, तर कुणी म्हणतंय की डान्स दाखवायला फक्त कुत्राच सापडला होता का?

Shivani Tichkule

Funny Viral Dance: सोशल मीडियावर आजकाल कधी काय व्हायरल होणार याचा नेम नाही. डान्ससाठी काहीही करून जाण्याची आवड अनेकदा लोकांमध्ये दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारचे डान्स सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर, तर काही थक्क करणारे असतात. आजकाल डान्स करणं प्रत्येकाला आवडतं. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमात ढोल ताशांचा गजर असेल तर पुरूष मंडळी अगदी बेभामपणे डान्स करतात.

गाणं लागलं की अनेकांचे हातपाय थिरकू लागतात. मात्र, नाचता-नाचता काही जण इतके बेभान होतात, की आपण काय करतोय याचं त्यांना भानही राहत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणी काला चष्मा या गाण्यावर एक कुत्र्यासोमर नाचताना दिसत आहेत. प्रसिद्ध होण्यासाठी आणि व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी, विचित्र गोष्टी करणे आजकाल एक ट्रेंड बनला आहे.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतील मुलीचा वेडेपणा पाहून सगळ्यांनाच हशा पिकला. हा व्हिडीओ पाहून कुणाला शोले चित्रपटातील ‘बसंती’ आठवत आहे, तर कुणी म्हणतंय की डान्स दाखवायला फक्त कुत्राच सापडला होता का?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुणी शेताच्या काठावर असलेल्या झाडाजवळ उभ्या आहेत. त्यातील एकीने लाल साडी नेसलेली आहे. त्यानंतर यातील एका मुलगी कुत्र्यासमोर 'काला चष्मा' गाण्यावर नाचू लागते. मुलीला पाहून कुत्राही विचार करत असेल की दीदीला अचानक काय झालं. मुलीचा हा डान्स पाहून नेटकऱ्यांनाही यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, बसंतीने शेवटी कुत्र्यांसमोर डान्स केला. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, ती बसंती-2 निघाली. आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, कुत्र्यांचाही विचार करणारं कोणीतरी असू द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT