Crime News SaamTV
देश विदेश

Crime news: भंयकर तितकंच विचित्र! आधी त्याला ड्रग्ज देऊन बेशुद्ध केलं, नंतर गुप्तांग कापून घेऊन गेले

Ghaziabad Crime News: अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन ते चार गुंडांनी एका डेअरीच्या संचालकाचा गुंप्तांग कापून पळवून नेला आहे.

Bhagyashree Kamble

अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन ते चार गुंडांनी एका डेअरीच्या संचालकांचा गुंप्तांग कापून पळवून नेला आहे. ही भयानक घटना गाझियाबादच्या वेव्ह सिटी पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.

५० वर्षीय पीडित व्यक्ती झोपलेला असताना त्याच्यासोबत हे भयानक कृत्य घडलं. या धक्कादायक घटनेनंतर त्याच्या मुलानं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

बामहेटा गावातील एका डेअरी संचालकांचा गुप्तांग कापून गुंड पसार झाले आहेत. ३-४ गुंडांनी हे भयानक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. संजय यादव असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. ते आपल्या खोलीत झोपले होते. दरम्यान, रात्रीचे ११ वाजता तीन ते चार गुंड यादव यांच्या घरी घुसले. त्यावेळी संजय यादव झोपले होते.

त्यानंतर गुन्हेगारांनी संजय यादवला अंमली पदार्थाचा वास दिला. त्यानंतर यादव झोपेतच बेशुद्ध झाले. यानंतर गुंडांनी धारदार शस्त्रानं त्यांचे गुप्तांग कापले. यावेळी संजय जोरात ओरडले. कुटुंब जागे झाले. पण तोपर्यंत गुंड फरार झाले. संजय यांना तातडीनं खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर संजय यांचा मुलगा प्रिन्स यानं पोलीस ठाण्यात धाव घेत गुंडांविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, प्रिन्स याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तपास सुरू आहे. संजय यांची प्रकृती स्थिर आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT