calling husband fat or dark divorce case Saam TV marathi (AI)
देश विदेश

Divorce Case : पतीला जाडा किंवा काळा बोलणं घटस्फोटाचं कारण मानलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

calling husband fat or dark divorce case : पतीला जाडा किंवा काळा बोलणे हे चुकीचे असले तरी केवळ या कारणावरून मानसिक क्रूरता सिद्ध होत नाही, असे छत्तीसगढ हायकोर्टाने म्हटले आहे.

Namdeo Kumbhar

Chhattisgarh High Court divorce verdict : वैवाहिक संबंधांमध्ये शारीरिक स्वरूपावरून किंवा रंगावरून वापरले जाणारे शब्द हा क्रूरतेचा भाग मानून घटस्फोटाचा आधार बनू शकत नाही, अशी टिप्पणी छत्तीसगढ उच्च न्यायालयाने केली आहे. न्यायालयाने नमूद केले की, वैवाहिक आयुष्यात घडणाऱ्या लहान-मोठ्या वादादरम्यान एकमेकांना रंगावरून किंवा वजनावरून बोलणे हे चुकीचे असले, तरी त्याला कायद्याच्या चौकटीत 'मानसिक क्रूरता' ठरवून लग्नाची गाठ तोडण्याचे थेट कारण मानता येत नाही.

एका प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले की, जर पत्नीने पतीला काळा किंवा जाड्या म्हटले म्हणून हे कारण घटस्फोटासाठी ग्राह्य धरले जाऊ शकत नाही. कौटुंबिक वादात वापरल्या जाणाऱ्या अशा शब्दांमुळे संसार मोडीत काढता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत क्रूरतेचे इतर कोणतेही गंभीर पुरावे समोर येत नाहीत, तोपर्यंत फक्त जाड्या किंवा काळा बोलल्याच्या आधारावर घटस्फोट दिला जाऊ शकत नाही. दरम्यान, न्यायमूर्ती पार्थ प्रतिम साहू आणि न्यायमूर्ती सचिन सिंह राजपूत यांच्या खंडपीठाने पतीने दाखल केलेले याचिका फेटाळून लावली.

नेमकं प्रकरण काय आहे?

हा वाद जांजगीर-चंपा येथील रहिवासी आकाश घोष (पती) आणि रायगड येथील पूजा सीत (पत्नी) यांच्यातील वैवाहिक संघर्षाचा आहे. मार्च २०१९ मध्ये लग्न झाल्यानंतर अवघ्या २-३ महिन्यांतच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. पतीने पत्नीच्या वाईट वर्तनाचे आणि त्रासाचे कारण देत जांजगीरच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

पत्नी लग्नानंतर अवघे काही महिनेच सोबत राहिली त्यानंतर तिचे वर्तन अतिशय शत्रुत्वाचे होते. काहीही न सांगता २५ दिवसांसाठी राजस्थानला निघून गेली आणि नंतर माहेरी रायगडला निघून गेली. नातेवाईकांना सोबत घेऊन माघारी घरी परत आणण्याचा प्रयत्न केला. पण तिने येण्यास नकार दिला. पती व त्याच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचाराचा (Domestic Violence) खटला दाखल केला, असा आरोप पतीने केला.

पत्नीने पतीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा तिने केला आहे.या अनैतिक संबंधांची माहिती समोर आल्यानंतर दारू पिऊन वाईट वागणूक देत होता, असा आरोप पत्नीने केला आहे.

पुराव्यांअभावी उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

फक्त आरोपांची संख्या जास्त असल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय दिला जाऊ शकत नाही. पतीने केलेल्या आरोपांना पाठबळ देणारे कोणतेही ठोस आणि विश्वासार्ह पुरावे न्यायालयात सादर केले गेले नव्हते. पत्नीने पतीला त्याच्या सावळ्या रंगावरून आणि लठ्ठपणावरून टोमणे मारल्याचा आरोप केला होता. पण या प्रकरणातील एकूण परिस्थिती पाहता केवळ अशा कथित गैरवर्तनाच्या आधारावर घटस्फोट देता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पतीने पत्नीवर अनेक आरोप लावले होते, मात्र 'फक्त आरोपांची संख्या जास्त आहे' म्हणून ते सिद्ध झाले असे मानले जात नाही. प्रत्येक आरोपासाठी पुरावा असावा लागतो. पत्नी २०१९ पासून कोणत्याही वैध कारणाशिवाय माहेरी वेगळी राहत असल्याचा पतीचा दावा होता. मात्र, ती 'विनाकारण' माहेरी राहत होती, हे सिद्ध करण्यात पती पूर्णपणे अपयशी ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Kulkarni: गौरी कुलकर्णीचं खास फोटोशूट; जांभळ्या साडीत खुललं सौंदर्य, साधेपणात खुलला स्टायलिश अंदाज

Maharashtra News Live Update : यवतमाळमध्ये अल्पभूधारक युवा शेतकऱ्याचा मृत्यू

Mangalsutra Designs: 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र, 5 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

15 Days Without Maida: 15 दिवस मैदा खाणं सोडलं तर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Soaked pomegranate: डाळिंबाचे दाणे १५ मिनिटं कोमट पाण्यात भिजवून खाल्ले तर काय होईल? हा उपाय वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT