German Christmas market Saam Tv
देश विदेश

Germany Attack: ख्रिसमस मार्केटमध्ये कारने एकामागून एकाला चिरडले, दोघांचा मृत्यू, ६८ जखमी

German Christmas Market: जर्मनीच्या मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये मोठी गर्दी होती. त्याचवेळी या मार्केटमध्ये भरधाव कार घुसली. याप्रकरणी डॉक्टराला अटक करण्यात आली आहे.

Priya More

जर्मनीमधील मॅग्डेबर्ग येथे ख्रिसमस मार्केटवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मार्केटमध्ये घुसलेल्या भरधाव कारने अनेकांना चिरडलं. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू तर ६८ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सौदी अरबच्या ५० वर्षीय डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली. कार मार्केटमध्ये घुसल्यामुळे गोंधळ उडाला. जखमींवर नजीकच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीच्या मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये मोठी गर्दी होती. त्याचवेळी या मार्केटमध्ये भरधाव कार घुसली. या कारने अनेकांना चिरडले. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका तरुण आणि मुलाचा समावेश आहे. तर ६८ जण जखमी झाले आहेत. जखमींमधील १५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

जर्मनीच्या ख्रिसमस मार्केटवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. हा व्यक्ती कारमध्ये एकटात होता. आरोपी ५० वर्षांचा असून तो डॉक्टर आहे आणि मूळचा सौदी अरेबियाचा आहे. हा डॉक्टर जर्मनीमध्ये काम करतो. गेल्या २० वर्षांपासून हा डॉक्टर जर्मनीमध्ये राहतो. आरोपी डॉक्टरची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. कार मार्केटमध्ये घुसली त्यावेळी डॉक्टर एकटाच कारमध्ये होता.

कारमध्ये काही स्फोटकं असतील असा संशय आधी पोलिसांनी व्यक्त केला होता. पण तपासादरम्यान कारमध्ये काहीच आढळले नाही. अपघातानंतर ख्रिसमस मार्केटमध्ये गोंधळाचे वातावरण होते. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपीला अटक केली. या घटनेमुळे जर्मनी हादरले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, भरधाव कार थेट टाऊन हॉलच्या दिशेने असलेल्या मार्केटमधील गर्दीच्या दिशेने घुसली. मार्केटमध्ये गर्दी असल्यामुळे अनेक जणांना कारने धडक दिली. त्यामुळे नागरिक प्रचंड घाबरले. सर्वजण इकडे तिकडे पळू लागले. जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. या घटनेचा सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT