Gen Z protesters intensify agitation as CJP targets Amit Shah over foreign funding controversy saam tv
देश विदेश

CJPच्या टार्गेटवर आता अमित शाह, विदेशी फंडिंगच्या मुद्यावरून राजीनाम्याची मागणी

CJP Targets Amit Shah Amid Foreign Funding Allegations: GEN Z आंदोलक आता सरकारविरोधात दुसरा लढा उभारणार आहे... मात्र CJPच्या आंदोलनाला विदेशी फंडिंग मिळत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलेल्यानं त्याचं मुद्द्यावरून अभिजित दिपकेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना टार्गेट केलयं..प्रधानांनंतर थेट अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी का होतेय? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

नीट पेपरफुटीप्रकरणी क्रॉकोच जनता पार्टीनं विद्यार्थ्यांचं जनआंदोलन उभारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच....मात्र CJPनं आता सरकारविरोधात दुसरा लढा उभारण्याची तयारी सुरू केलीय. त्याला कारण ठरलंय विदेशी फंडिगचा मुद्दा. सीजेपीच्या आंदोलनाला विदेशी फडिंग मिळत असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला...आता याचं आरोपावरून CJPच्या अभिजित दिपकेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना घेरण्याची रणनिती आखलीय...आधीच पॅलेट गनच्या मुद्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी केलीय...अशातच CJPला विदेशी फंडिग मिळत असेल तर ते रोखण्यात गृहमंत्र्यांचं अपय़श आहे, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा अशी मागणी दिपकेंनी केलीय... तर दिपके प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी मोठ्या लोकांची नावं घेत असल्याची टीका भाजपनं केलीय...

तर यात विरोधकांनीही आता पुलवामा आणि पेहलगामच्या दहशतवादी हल्ल्यांवरून अमित शाहांवर निशाणा साधलाय. दुसरीकडे GEN Z नं आता शेतकरी मोर्चाला गरज पडली तर पाठिंबा देण्याचीही तयारी दर्शवलीय. त्यामुळे शेतकरी मोर्चाच्या माध्यामातूनही CJP केंद्र सरकारविरोधात सक्रीय राहणार असल्याची चिन्ह आहेत...

सीजेपीनं आता वेगवेगळ्या मुद्यांवरून राजकीय सक्रीयता दाखवण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे पॅलेट गनच्या मुद्यासोबतच विदेशी फंडिंगच्या मुद्यावरून अमित शाहांच्या राजीनाम्याचा मुद्या तापवण्य़ात सीजेपी किती यश येणार? आणि जेन झी पुन्हा रस्त्यावर उतरणार का? याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Headphone Tips : हेडफोन तुम्हाला बहिरे करतायत? वेळ निघून जाण्याआधी 'या' ७ गोष्टी समजून घ्या

Fact Check: मोदींची इन्स्टावरून मन की बात? दर रविवारी मोदी युवकांशी संवाद साधणार?

नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांचा बळी, जीवघेण्या खड्ड्यांना जबाबदार कोण? महाराष्ट्र खड्ड्यात कुणी घातला?

Maharashtra News Live Update: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या भागातील एक झाड शासकीय वाहनावर कोसळले.

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाचा पत्ता बदलणार; काय असणार नवीन पत्ता?

SCROLL FOR NEXT