Viral Video| कचरा गोळा करणाऱ्या वृद्ध महिलेची इंग्लिश ऐकून तुम्हीदेखील अवाक व्हाल Instagram/@itmeshachinaheggar
देश विदेश

Viral Video| कचरा गोळा करणाऱ्या वृद्ध महिलेची इंग्लिश ऐकून तुम्हीदेखील अवाक व्हाल

समोरच्याचा रंग, रूप आणि कपडे पाहून कधीही आपण गैरसमज करून घेणं टाळले पाहिजे. सध्या सोशल मीडियावर याचे उदाहरण देणारा एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : समोरच्याचा रंग, रूप आणि कपडे पाहून कधीही आपण गैरसमज करून घेणं टाळले पाहिजे. सध्या सोशल मीडियावर याचे उदाहरण देणारा एका महिलेचा Woman व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला कचरा गोळा करते आणि तिचाच जबरदस्त इंग्लिश बोलतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला दिसत आहे. या महिलेच्या मते त्यांनी जपानमध्ये 7 वर्ष काम केलेले आहे. या व्हिडिओनुसार, ती सांगते की, सात वर्षानंतर ती भारतात India परतली. यासोबतच हे सर्व सांगताना महिला एक गाणंही song म्हणते. महिलेनं आपलं नाव Cecilia Margaret Lawrence असल्याचं सांगितले आहे.

ज्या महिलेने हा व्हिडिओ बनवला आहे तिने सांगितले की, जेव्हा मी या महिलेला भेटली तेव्हा महिला कचरा उचलत होती. तसेच व्हिडीओ मधील या महिलेने सांगितले की, प्लास्टिक विकून जे पैसे येतात, त्यातून ती स्वतःचा सांभाळ करते. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे आणि व्हायरल Viral होत आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT