Gandee Aurat News Saam TV
देश विदेश

Gandee Aurat News: 'गंदी महिला'म्हटल्यानं प्रतिष्ठेला धक्का पोहचत नाही; दिल्ली हायकोर्टाने खटलाच निकाली काढला

Delhi News: महिलेचा अपमान करणे किंवा तिच्या प्रतिष्ठेला ठेच पोहवण्यासारखे काहीच नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

Ruchika Jadhav

Delhi High Court:

महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशात विनयभंगातील एका केसमध्ये दिल्ली हायकोर्टाने विशेष टिप्पणी नोंदवली आहे. महिलेचा 'गंदी औरत' असा उल्लेख केल्यास त्यावर याचिका दाखल होऊ शकत नाही. यामध्ये महिलेचा अपमान करणे किंवा तिच्या प्रतिष्ठेला ठेच पोहवण्यासारखे काहीच नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. (Latest Crime News)

एका पुरुषाने महिलेला गंदी महिला असं म्हटलं होतं. त्यावर महिलेने न्यायालयात खटला चालवण्यासाठी याचिका दाखल केली होती. महिलेची ही याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे.

न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठाने यावर म्हटलं आहे की, न्यायालयीन निकाल देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. यामध्ये लिंग समानता देखील मानली जाते. त्यामुळे गंदी महिला म्हटल्याने त्या व्यक्तीने असभ्य वर्तन केल्यासारखे दिसत नाही.

नेमकं प्रकण काय?

फिर्यादी महिला आणि पुरुष हे दोघेही एकाच कंपनीत काम करतात. महिलेने त्या व्यक्तीला १००० रुपये देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने तिला तू गंदी महिला आहेस असं म्हटलं. यावरुन महिलेने आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टात धाव घेतली. मात्र हा शब्द कलम ५०९ मध्ये बसत नसल्याचं कोर्टाने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

SCROLL FOR NEXT