Petrol pumps in India may soon witness a sharp price hike as global crude oil prices surge beyond $125 per barre saam tv
देश विदेश

पेट्रोल-डिझेलचा भाव वाढणार? कच्च्या तेलाच्या किमती 125 डॉलरच्या वर

Crude Oil Surge May Push Petrol Prices to ₹130+ In India: आखाती देशांतील तणावाच्या स्थितीमुळे इंधनाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. भारतात इंधन दरवाढ अटळ असल्याचे संकेत खुद्द वित्त मंत्रालयाने दिले आहेत. ही दरवाढ नेमकी कधी होऊ शकते ? पेट्रोल किती रुपयांनी महागणार ? पाहूया एक खास रिपोर्ट...

Girish Nikam

आखाती देशांतील युद्धामुळे संपूर्ण जगाचीच इंधन कोंडी झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि होर्मुझच्या नाकेबंदीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. त्यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या चार वर्षातील मोठी वाढ झालीये. तेलाच्या किमती 7 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 125 डॉलरच्या वर गेल्या आहेत. 2022च्या मध्यापासूनची ही सर्वोच्च पातळी आहे.

या दरवाढीचा भारतावरही परिणाम होऊ शकतो. इंधन दरवाढ अटळ असल्य़ाचे संकेत केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अहवालातून दिले आहेत. सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर असल्या तरी, तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 20 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 100 रुपये असा प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. भारतात कच्च्या तेलाच्या बॅरेलची किंमत एप्रिलमध्ये सरासरी 114.3 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. जी युद्ध सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये केवळ 69.01 डॉलर होती. त्यामुळे वाढीव किमतींचा बोजा ग्राहकांवर टाकणे आता 'अपरिहार्य' असल्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयानं आपल्या एप्रिल महिन्याच्या आर्थिक अहवालात म्हटले आहे.

दुसरीकडे पेट्रोलच्या दरात तब्बल 28 रुपयांची वाढ होण्याची शक्यता कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

म्हणजेच मुंबईत सध्या पेट्रोल 103 रुपये 50 पैसे आहे. त्यात 28 रुपयांची वाढ झाल्यास 131 रुपये 50 पैसे दरवाढ होऊ शकते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही निवडणुकीनंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त करत मोदी सरकारवर निशाणा साधालाय. तर केंद्र सरकारने सध्या असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर सामान्यांच्या खिशाला झळ बसणार का?याकडे देशाचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भरधाव कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली; एकाच कुंटुबातील ४ जणांचा मृत्यू

Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SRPF भरती घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; पेपर फुटीचा मुख्य आरोपी आला समोर

Accident: पालघरमध्ये अपघाताचा थरार, २ दुचाकींची समोरासमोर धडक; २ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर

Bribe Case: मुंबईतील ज्युनियर कॉलेजच्या मंजुरीसाठी मागितली दीड लाखांची लाच; लिपिकाला ठोकल्या बेड्या, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT