Vaccination: 1 जानेवारीपासून लहान मुलांना CoWIN वर करता येणार नोंदणी Saam Tv
देश विदेश

Vaccination: 1 जानेवारीपासून लहान मुलांना CoWIN वर करता येणार नोंदणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : देशामध्ये आता १५ ते १८ वयोगटामधील मुलांसाठी लसीकरण (Vaccination) सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) याची नुकतीच घोषणा केली आहे. याकरिता या मुलांना १ जानेवारी २०२२ पासून CoWIN पोर्टलवर नाव नोंदणी करता येणार आहे, CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा (Dr. R. S. Sharma) यांनी ही माहिती दिली आहे.

हे देखील पहा-

डॉ. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "१५ ते १८ वयोगटामधील मुले १ जानेवारीपासून CoWIN पोर्टलवर (portal) नोंदणीकरिता पात्र असणार आहेत. याकरिता कोविन पोर्टलमध्ये नोंदणीवेळी ओळखपत्राकरिता १० वीचं विद्यार्थी ओळखपत्र सादर करता येणार आहे. कारण काही विद्यार्थ्यांकडे (students) आधार कार्ड किंवा इतर कोणते ओळखपत्र नसू शकते. यामुळे त्यांच्याकरिता ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी (२५ डिसेंबर) रात्री देशाला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी लसीकरण बाबत ३ मोठ्या घोषणा केले आहेत. ख्रिसमस (Christmas) आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी नागरिकांना दिलेली ही भेट आहे. मोदींनी केलेल्या घोषणांनुसार, आता देशामध्ये ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. तसेच १० डिसेंबरपासून आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस देखील (Booster Dose) सुरु करण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT