MM Naravane Four Stars of Destiny controversy Saam TV Marathi
देश विदेश

Four Stars of Destiny : पुस्तकाचे पान, राजकारणाचे रान! जनरल नरवणेंच्या आत्मचरित्रावरून भाजप-काँग्रेसमध्ये 'अग्निपथ'

Agnipath scheme criticism in Naravane book : माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्या अप्रकाशित ‘Four Stars of Destiny’ पुस्तकातील उल्लेखांमुळे अग्निपथ योजनेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद पेटला आहे.

Namdeo Kumbhar

MM Naravane Four Stars of Destiny controversy : माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांचे 'Four Stars of Destiny' हे आत्मकथनात्मक अप्रकाशित पुस्तक ध्या खूप चर्चेत आहे. या पुस्तकावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. 'अग्निपथ' योजनेच्या अंमलबजावणीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली. लोकसभेत यावर सोमवारी गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी पुस्तकातील मजकूर वाचून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याला भाजप नेत्यांकडून विरोध करण्यात आला.

अग्निपथ योजना लष्करासाठी "धक्का" (Bolt from the blue) होती. ही योजना तिन्ही दलांवर लादली गेल्याचा उल्लेख केला. काँग्रेसने या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. सरकारने लष्करी नेतृत्वाचा सल्ला न घेता ही योजना घाईने राबवून देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली, असा आरोप काँग्रेसने केला. याला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. लष्कराचे आधुनिकीकरण करण्यासाठी ही योजना क्रांतिकारी आहे. काँग्रेसने नरवणे यांच्या विधानांचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने लावल्याचा आरोप भाजपने केलाय. माजी लष्करप्रमुखांचा व्हिडिओ भाजपकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्याला काँग्रेसने पुस्तकातील काही मजकूर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले.

भाजपने एक्स खात्यावर नेमकं काय म्हटले?

राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपने एक्स खात्यावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यासोबत त्यांनी म्हटले की, "राहुल गांधी लज्जास्पद राजकारण करत आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, 'एक इंचही जमीन गमावली नाही. आपण जिथे होतो तिथेच आहोत.' राहुल गांधींनी त्यांच्या वक्तव्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने उपस्थित केला जातोय. त्यांनी एका पुस्तकाद्वारे माजी लष्करप्रमुखाला त्यांच्या घाणेरड्या राजकारणात ओढले आहे. ते पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही, असेही पोस्टमध्ये भाजपने म्हटलेय.

काँग्रेसने काय प्रत्युत्तर दिले?

काँग्रेसने भाजपच्या नरवणे यांच्या पोस्टला उत्तर दिले. एक्स खात्यावर काँग्रेसने नरवणे यांच्या पुस्तकातील काही पेजेस शेअर केले. हा जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या 'फॉर स्टेट्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकाचा भाग आहे. राहुल गांधी लोकसभेत मांडणार होते, तो भाग इथे आहे. या पुस्तकात असे काय लिहिले आहे जे मोदी सरकारला घाबरवत आहे? तुम्ही पुस्तकाचा तो भाग स्वतः वाचला पाहिजे, असे काँग्रेसने म्हटलेय.

'फॉर स्टेट्स ऑफ डेस्टिनी' मध्ये नेमकं काय? काँग्रेसने पोस्ट केलेल्या फोटोचा थोडक्यात अर्थ -

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे 'Four Stars of Destiny' हे आत्मकथात्मक पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे. तुम्ही उल्लेख केलेल्या पोस्टमध्ये (आणि पुस्तकातील व्हायरल झालेल्या काही भागांमध्ये) ३१ ऑगस्ट २०२० च्या रात्रीचा एक अतिशय महत्त्वाचा आणि थरारक किस्सा दिलेला आहे.

३१ ऑगस्ट २०२० ची ती रात्र, काँग्रेसने पोस्ट केलेल्या फोटोत नेमकं काय?

३१ ऑगस्ट २०२० रोजी पूर्व लडाखमधील 'रेचिन ला' खिंडीच्या परिसरात चिनी सैन्य आणि त्यांचे रणगाडे भारतीय सीमेच्या अगदी जवळ आले होते. चिनी सैन्य आपल्या लष्कराच्या हालचालींना उत्तर देण्यासाठी पुढे सरसावत होते. परिस्थिती इतकी गंभीर होती की दोन्ही देशांचे रणगाडे एकमेकांपासून केवळ काही मीटर अंतरावर उभे होते. लेफ्टिनेंट जनरल योगेश जोशी यांनी येथील परिस्थितीची माहिती जनरल सिंह यांना दिली.

जनरल नरवणे यांनी पुस्तकात लिहिले आहे की, त्या रात्री ते अत्यंत तणावात होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती. त्यांनी तात्काळ तत्कालीन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अजीत डोभाल, बिपीन रावत, एस जयशंकर यांना परिस्थितीची कल्पना दिली. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, माझ्यासाठी नेमके काय आदेश आहेत? असा प्रत्येकाला एकच सवाल होता. काही तासानंतर राजनाथ सिंह यांचा नरवणेंना फोन आला. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करून फोन केला होता, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला. राजधान सिंह म्हणाले की, "पंतप्रधानांनी निरोप दिला आहे की, परिस्थितीनुसार तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घ्या." (Whatever you feel is appropriate, do that).

पंतप्रधानांच्या या निरोपानंतर लष्करप्रमुख म्हणून नरवणे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. जर भारतीय सैन्याने गोळीबार केला असता, तर मोठे युद्ध सुरू झाले असते. मात्र, नरवणे यांनी संयम राखला. जनरल नरवणे यांच्या या निर्णयामुळे आणि योग्य रणनीतीमुळे त्या रात्री गोळीबार झाला नाही आणि संभाव्य युद्ध टळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentines Day Gift: व्हॅलेंटाईन डे साठी स्वस्तात मस्त गिफ्ट हवंय? हे ट्रेंडी ब्रेसलेट आहे बेस्ट ऑप्शन

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ३ प्रवाशांचा मृत्यू; १५ जण गंभीर जखमी

Early Cancer Symptoms: महिनाभर आधी त्वचेवर दिसतील 'ही' कॅन्सरची लक्षणे, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

Gujrat : होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिका भडकली; विद्यार्थीनीच्या कानाखाली मारली अन्...; न्यालयाने सुनावली भयंकर शिक्षा

Shani Uday: 30 वर्षांनंतर शनी गुरूच्या राशीत होणार उदय; या राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

SCROLL FOR NEXT