Chief Minister N Biren Singh ANI
देश विदेश

Manipur : मणिपूरमधील २ विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी ४ जणांना अटक; आरोपींना फाशी द्या: मुख्यमंत्र्यांची मागणी

Manipur : मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने चार जणांना अटक केलीय.

Bharat Jadhav

Manipur :

मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं रविवारी ४ जणांना अटक केलीय. सीबीआयनं या आरोपींना चुराचांदपूर येथून अटक केलीय. तपास यंत्रणेने सर्व आरोपींना आसाम येथील गुवाहाटी येथे नेले आहे. दरम्यान यापूर्वी माहिती आली होती, ६ आरोपींना विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली. त्यापैकी २ जण अल्पवयीन आहेत. पण नंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणी ४ आरोपी पकडण्यात आले आहे.(Latest News)

सीबीआयनं आता अटक सत्र चालवलंय. आतापर्यंत ४जणांना अटक करण्यात आलीय. पाओमिनलुन हाओकिप, एस. मालस्वान हाओकिप, लिंग्नेइचोन बाइट आणि टिन्नुपिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. पुढे बोलताना मुख्यमंत्री सिंह यांनी सांगितले की, फिजाम हेमनजी आणि हिजाम लिनथोइंगंबीच्या अपहरण आणि हत्येतील आरोपींना आज चुराचांदपूर येथून अटक करण्यात आलीय. या विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी आरोपींनी अटक करण्यात आलीय. सरकार या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयात करेल.

मुख्यमंत्री सिंह यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएचं एक जबाब वाचताना सांगितलं की, राज्यातील अशांतता निर्माण करण्यात बाहेरील देशाचा हात आहे. या देशाच्या हस्तक्षेपामुळे मणिपूरमध्ये अशी स्थिती निर्माण झालीय. एनआयएने सेमिनलून गंगटेला अटक केली. यामुळे मणिपूरमधील अशांततेमागे बाहेरील देशाचा हात असल्याचं स्पष्ट झालंय.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हेगार अपराध करून पळू जाऊ शकतो. परंतु कायद्याच्या कचाट्यातून ते वाचू शकत नाही. सरकार त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा किंवा सर्वात मोठी शिक्षा देण्यास प्रतिबद्ध आहे.

दरम्यान २३ सप्टेंबरला मोबाईल इंटरनेटवरची सेवा चालू करण्यात आली होती. त्यानंतर या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले होते. या दोन विद्यार्थ्यांची हत्या झाल्यामुळे राज्यातील विद्यार्थी आक्रमक झाले होते आणि त्यांनी हिंसक आंदोलन केले होते. यानंतर पोलिसांच्या कारवाईत ६० पेक्षा जास्त आंदोलनकर्ते जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : गर्दीपासून दूर, सह्याद्रीच्या कुशीत! नाशिकमधील ७ ऑफबीट किल्ल्यांवर दिवाळीत भटकंती करा

Maharashtra News Live Update: पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील हॉटेलमध्ये तोडफोड

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT