तामीळनाडूचे माजी मंत्री एम मणीकंदन यांना बलात्कार प्रकरणात अटक  - वृत्तसंस्था
देश विदेश

मलेशियन अभिनेत्रीवर बलात्कार प्रकरणात तामीळनाडूच्या माजी मंत्र्याला अटक

'एआयडीएमके' AIADMK चे माजी मंत्री एम मणीकंदन यांना एका मलेशियन Malasia महिलेवर बलात्कार Rape केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे AIADMK Ex Ministrer Arrested for Rape

वृत्तसंस्था

चेन्नई : 'एआयडीएमके'चे माजी मंत्री एण मणीकंदन यांना एका मलेशियन महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ही महिला मलेशियाची अभिनेत्री असून लग्नाच्या बहाण्याने मणीकंदन यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मणीकंदन यांची २०१७ मध्ये या अभिनेत्रीशी ओळख झाली होती.

हे देखिल पहा

४४ वर्षीय मणीकंदन यांनी या महिलेला लग्नाचे अमीष दाखवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला धमक्या देऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला. मणीकंदन यांनी या अभिनेत्रीला जबरदस्तीने गर्भपातही करायला लावला. २०१७ पासून मणीकंदन या अभिनेत्रीसोबत रहात होते. चेन्नई तसेच दिल्लीत त्यांनी या अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

मणीकंदन यांनी मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे आरोप असल्याचे न्यायालयाने जामीन फेटाळताना नमूद केले. त्यानंतर मणीकंदन यांना अटक करण्यात आली.

Edited By - अमित गोळवलकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

Pandharpur Crime : पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या

SCROLL FOR NEXT