Former Uttarakhand Chief Minister B.C. Khanduri passes away after prolonged illness in Dehradun. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Ex-Chief Minister Bhuvan Chandra Khanduri Dies After Prolonged Illness: उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवन चंद्र खंडुरी यांचे आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून अनेक नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Saam Tv

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री मेजर जनरल भुवन चंद्र खंडुरी यांचे सोमवारी निधन झाले आहे. खंडुरी मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. देहरादूनच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. खंडुरी यांची मुलगी तथा उत्तराखंडचे विधानसभा अध्यक्ष रितू खंडुरी भूषण यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. खंडुरी हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून कार्यरत होते. ते भाजपचे एक ज्येष्ठ नेते होते.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी खंडुरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले की, खंडुरी यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावत असताना राष्ट्रसेवा, शिस्त आणि समर्पणाचा एक अतुलनीय आदर्श घालून दिला. त्यांच्या लष्करी कारकीर्दपासून ते सार्वजनिक जीवनापर्यंत त्यांचे व्यक्तिमत्व राष्ट्रहित आणि लोकसेवेसाठी समर्पित होते. धामी पुढे म्हणाले की खंडुरी यांच्या जाण्याने राष्ट्रीय राजकारणासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे.

दोनवेळा राहिले होते मुख्यमंत्री

भुवनचंद्र खंडुरी हे भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते 2007 मध्ये पहिल्यांदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले. 2007 ते 2009 पर्यंत खंडुरी मुख्यमंत्रिपदावर होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नव्हते म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर सप्टेंबर 2011 ते 2012 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॅन मध्ये डिझेल घेऊन जाणाऱ्यांमुळेच परिस्थिती गंभीर- पेट्रोल पंप असोसिएशन

Skin Care: स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरताना 'ही' एक चूक तुमचा चेहरा करेल खराब!

विजय यांचं सरकार कोसळणार! तामिळनाडूत कधीही निवडणुका लागू शकतात, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

काळजातं भिडणारं सौंदर्य, Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली प्राजक्ता माळी अन् चाहते झाले घायाळ

Healthy Aging Test: वाढत्या वयानुसार तुम्ही किती फीट आहात? ३० सेकंदांची टेस्ट सांगणार तुमचा फीटनेस

SCROLL FOR NEXT