Donald Trump Dance in Rally saam tv
देश विदेश

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Donald Trump Video : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी अखेरच्या दिवशी मिशिगनमध्ये प्रचारसभा घेतली. तब्बल दोन तास ट्रम्प व्यासपीठावरून नॉन स्टॉप बोलत होते. शेवटी व्यासपीठावरून खाली उतरत नागरिकांमध्ये गेले आणि त्यांच्यासोबत जोरदार डान्स केला.

Nandkumar Joshi

अख्ख्या जगाचं लक्ष लागून राहिलेला तो क्षण अखेर जवळ आला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूक होत आहे. निकाल येण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. काही तासांनी मतदानास सुरुवात होईल. त्याआधी मंगळवारी रिपब्लिकनचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेरची जाहीर प्रचारसभा घेतली. या रॅलीत ते जोरदार नाचले. अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय असे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्याशी त्यांनी स्वतःची तुलना केली.

डोनाल्ड ट्रम्प यांची मंगळवारी मिशिगनमध्ये अखेरची प्रचार रॅली झाली. जवळपास दोन तास ते व्यासपीठावरून मतदारांशी संवाद साधत होते. अविरत ते बोलत होते. शेवटी ते व्यासपीठावरून खाली उतरले. सभेला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये गेले. तेथे त्यांच्याशी संवाद साधला. लोकांशी त्यांनी हस्तांदोलन केले. त्यांचे अभिवादनही स्वीकारले. तेथील फेमस पॉप साँग वायएमसीएवर ते मनसोक्त नाचले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स, VIDEO पाहण्यासाठी क्लिक करा.

लिंकन यांच्याशी तुलना

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यासपीठावरून संबोधित करताना अमेरिकेचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती राहिलेले अब्राहम लिंकन यांच्याशी स्वतःची तुलना केली. आपणही त्यांच्यासारखेच असल्याचे ट्रम्प म्हणाले.

यापूर्वीही त्यांनी अनेकदा लिंकन यांच्याशी स्वतःची तुलना केली आहे. याचवेळी ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची खिल्लीही उडवली होती. समजा, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग युद्ध किंवा तैवानसंबंधित अमेरिकेशी चर्चा करू इच्छित आहेत, तर ते कुणाला फोन करतील? अशावेळी ते कदाचित माझ्याशी फोनवरून संपर्क साधतील, असे सांगतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार टोलेबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT