Former Shiv Sena MLA Crime news Saam Tv News
देश विदेश

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

Former Shiv Sena MLA Crime news: उत्तर प्रदेशातील शिवसेनेचे माजी आमदार गुड्डू पंडित अडचणीत. पीडित महिलेचा आरोप – लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार. बंगळूरुतील पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली घटना

Bhagyashree Kamble

  • उत्तर प्रदेशातील शिवसेनेचे माजी आमदार गुड्डू पंडित अडचणीत

  • पीडित महिलेचा आरोप – लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार

  • बंगळूरुतील पंचतारांकित हॉटेलमध्ये घडली घटना

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

उत्तर प्रदेशातील शिवसेनेचे माजी आमदार भगवान शर्मा उर्फ गुड्डू पंडित यांच्याविरोधात महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेनं बंगळूरूमध्ये माजी आमदाराविरोधात तक्रार दाखल केलीये. पीडितेनं कोर्ट मॅरेजचं आश्वासन देऊन फसवलं असल्याचा आरोप केला आहे. माजी आमदारानं महिलेला शहरात फिरवलं. नंतर हॉटेलमध्ये नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती तिनं पोलिसांना दिली असून, पोलिसांनी तक्रारीनुसार, गुन्हा दाखल केलाय.

द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, संबंधित महिला २०१७ पासून शर्मासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. या जोडप्याला ७ वर्षांचा मुलगा आहे. मात्र, कायदेशीररित्या त्यांचं अद्याप लग्न झालेलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलंदशहर जिल्ह्यातील देबाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शर्मा १४ ऑगस्ट रोजी त्यांच्या जोडीदारासह व्यवसायाच्या निमित्ताने बंगळूरूला गेले होते. या प्रवासादरम्यान, अनेक ठिकाणी ते फिरले.

१६ ऑगस्ट रोजी चित्रदुर्गाहून परतताना केम्पेगौडा आतंरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका पंचतारंकित हॉटेलमध्ये माजी आमदारानं रूम बुक केला, तसेच महिलेला घेऊन गेले. याठिकाणी शर्मा यांनी महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. तसेच लैंगिक अत्याचार केला.

या प्रकरणानंतर महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठले तसेच माजी आमदाराविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विविध कलमांखाली गुड्डू पंडितविरोधात गुन्हा दाखल केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं टीएनआयई वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, 'प्राथमिक तपासात या जोडप्यानं यापूर्वी घरगुती वादावरून उत्तर प्रदेशातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती'.

पीडित महिलेनं आरोप केला की, लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केले आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balasaheb Thorat : तत्व आणि विचारांसाठी बलिदान द्यायला तयार; बाळासाहेब थोरात यांची कीर्तनकार संग्राम भंडारेंच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया

White Hair Problems: 'या' २ गोष्टींचे तेल केसांना लावा आणि तुमचे पांढरे केस पुन्हा काळे करा

Maharashtra Rain Live News: पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन एक्स्प्रेस आज रद्द

Mumbai Airport: मुंबई आभाळ फाटलं! मुसळधार पावसामुळे एअरपोर्ट पाण्याखाली, विमानसेवेवर परिणाम; पाहा VIDEO

KBC: विराट कोहलीच्या फ्लाइंग किसवर अमिताभ बच्चन यांचा यॉर्कर; अनुष्का शर्मा क्लीनबोल्ड

SCROLL FOR NEXT