Senior Congress leader and former MP minister Sajjan Singh Verma during the last rites of his wife Subhadra Verma in Indore. Saam Tv
देश विदेश

आधी मुलगा, आता पत्नीचे निधन; माजी मंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर दु:खाचा डोंगर, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Congress Leader Sajjan Singh Verma Wife Passes Away In Indore: माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जनसिंह वर्मा यांच्या पत्नी सुभद्रा वर्मा यांचे निधन झाले आहे. मुलाच्या निधनानंतर काही महिन्यांतच कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला.

Omkar Sonawane

एमपीचे माजी मंत्री यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सज्जनसिंह वर्मा यांच्या पत्नी सुभद्रा वर्मा यांचे रविवारी निधन झाले आहे. या दु:खद घटनेमुळे कुटुंबासह पक्षात शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते हे इंदौर येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी हे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी देखील सज्जनसिंह वर्मा यांच्या पत्नीच्या निधनावर दुख व्यक्त केले आहे. आज त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि कुटुंबिय उपस्थित झाले होते. सुभद्रा वर्मा यांच्या पश्चात त्यांना दोन मुलं होती. मे महिन्यामध्ये एका मुलाचे आकस्मिक निधन झाले होते. मुलगा गगनच्या निधनानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. आज सकाळी घरापासून त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केला शोक व्यक्त

माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सज्जन वर्मा यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले, मध्य प्रदेश सरकारचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री सज्जन सिंह वर्माजी यांच्या पत्नी श्रीमती सुभद्रा वर्माजी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांच्या पत्नीच्या आत्म्याला शांती द्यावी आणि शोकाकुल कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी.

जितू पटवारी यांनीही ट्विट करून आपले दुःख व्यक्त केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनीही पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांच्या पत्नी सुभद्रा वर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी इंदूर येथील माजी मंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि सज्जन सिंह वर्मा यांची भेट घेतल्यानंतर शोक व्यक्त केला.

ते म्हणाले, आज इंदूरमध्ये, माजी मंत्री आणि काँग्रेस कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य श्री. सज्जन वर्मा जी यांच्या निधनाबद्दल, मी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो आणि त्यांच्या पत्नी श्रीमती सुभद्रा वर्मा जी यांना श्रद्धांजली वाहिली आणि शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला शांती द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, असे त्यांनी आपले ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT