Pinarayi Vijayan driver news Saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Pinarayi Vijayan driver news : माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Vishal Gangurde

केरळमध्ये राजकीय संघर्ष पेटला

माजी मुख्यमंत्र्यांच्या कार चालकाला मारहाण झाल्याचा आरोप

मारहाण प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

केरळमध्ये काँग्रेसचे नवीन सरकार आल्यानंतर राजकीय संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर आता चालकाला मारहाण झाल्याची बाब समोर आली आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला मारहाण केल्या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याचे समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्र्यांचे चालक अनुप यांनी तक्रारीत म्हटलं की, माजी मुख्यमंत्री विजयन यांना ३० मे रोजी रेल्वे स्टेशनला सोडून परतताना तिरुवनंतपुरम रेल्वे स्टेशनवर पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. ही घटना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी विजयन हे तिरुवनंपुरम मंगलूरू वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवासाला निघाले होते.

चालक अनुप यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयन हे कारमधून उतरून स्टेशनला गेले. त्यानंतर कार पार्क करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यानंतर परिसरात तैनात असलेले पोलीस कारजवळ पोहोचले. अनूप यांच्या आरोपानुसार, पोलिसांनी कार पार्क करण्यावरून आक्षेप घेतला. त्यानंतर पोलसांनी शिवीगाळ केली. पुढे हल्ल्याचा प्रयत्न केला. अनुप यांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केला आहे. तसेच त्यांनी गैरवर्तवणूक केल्याचाही आरोप केला आहे.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी केरळमध्ये ईडी अधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापा टाकला होता. मनी लॉड्रिंग प्रकरणात त्यांचा मुलीचा सहभाग असल्याचा आरोप आहे. त्यामुळे ईडीने विजयन यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापा टाकला. विजयन यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

पिनराई विजयन यांचे शेकडो समर्थक निवासस्थानाजवळ पोहोचले. या समर्थकांनी थेट ईडी अधिकाऱ्याच्या कारवर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्याची कार फोडली. कार फोडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कारवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी तातडीने या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT