Sharad Yadav Passed Away Saam Tv
देश विदेश

Sharad Yadav Passed Away : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वृत्तसंस्था

Sharad Yadav Passed Away : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झाले आहे. यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झाले आहे. शरद यादव गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. काल रात्री त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. त्यानंतर तातडीनं फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली.

शरद यादव (Sharad Yadav) यांच्या मुलीनं ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. पापा नहीं रहे, असं ट्वीट शरद यादव यांच्या मुलीनं केलं आहे. गुरुग्राम येथील फोर्टिंस रुग्णालयात शरद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दिवसभर छतरपूर येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

शरद यादव जेडीयूचे (JDU) राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी सात वेळा खासदार म्हणून काम पाहिलेय. तसेच त्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांमधून लोकसभेवर खासदार म्हणून काम केलं. शरद यादव यांनी १९७४ पासून संसदीय राजकारणात खासदार म्हणून पाऊल टाकलं.

राजकीय वर्तुळात शोककळा

शरद यादव यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह दिग्गजांनी शरद यादव यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT