Former Prime Minister Shinzo, Ex-Japan PM Shot Live News, Shinzo Abe News, Former Japan PM, Latest Marathi News  Saam Tv
देश विदेश

Breaking: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा उपचारादरम्यन मृत्यू!

जपानच्या नारा शहरातील रस्त्यावर भाषण देत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.

वृत्तसंस्था

Shinzo Abe Dies: जपानचे (Japan) माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन झालं आहे. शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाला, भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, यात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

शिंजो आबे यांच्या छातीजवळ गोळी लागली होती, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला झाल्यानंतर शिंजो आबे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता.

जपानी पोलिसांनी (Police) सध्या एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण करत असताना मागून एका व्यक्तीने हल्ला केला. शिंजो आबे अचानक पडल्यामुळे तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही. मात्र यादरम्यान काही लोकांनी तेथे गोळीबार झाल्यासारखा काहीसा आवाज ऐकू आला. हल्लेखोरांनं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे.

जपानमध्ये रविवारी वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंगे आबे तेथे प्रचार करत होते. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे वय 41 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे, हल्ल्यानंतरचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये चेंगराचेंगरीची स्थिती दिसत आहे.

शिंजो आबे यांनी 2020 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ते जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहेत. गेल्या वर्षी भारताने शिंजो आबे यांना पद्मविभूषण देऊन गौरविले होते. भारताशी संबंध ठेवण्यात त्यांनी नेहमीच भर दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT