बराक ओबामांचा एलियन्सबाबत खळबळजनक दावा
ओबामांच्या वक्तव्यानंतर जागतिक पातळीवर चर्चा सुरू
अमेरिकेच्या गुप्त तळ एरिया 51 पुन्हा चर्चेत
पृथ्वीतलावर मानवासह असलेली जीवसृष्टी एकटीच आहे की ? की या ब्रम्हांडात पृथ्वीसारखं आणखी एखादं जग अस्तित्वात आहे? या प्रश्नाने जगाला शतकांपासून कोड्यात टाकलयं. वेगवेगळ्या पातळ्यांवर शास्त्रज्ञांचं सशोधन सुरु आहे. त्यातच एलियन्सच्या अस्तित्वाबाबत अनेक दावे समोर आलेत. एलियन्सच्या अस्तित्वाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. अशातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एका पॉडकास्टमध्ये एलियन्स अस्तित्वात असल्याचा दावा केलाय...ओबामा यांनी नेमकं काय म्हटले ऐका.
एलियन्स अस्तित्वात असल्याचं सांगताना ओबामा यांनी अमेरिकेतील एरिया 51 बद्दलही भाष्य केलयं...'एरिया 51' मध्ये एलियन्स नसल्याचं सांगितलयं. मात्र हे एरिया- 51 नेमकं काय आहे पाहूयात.
एरिया 51 हा अमेरिकेचा भूमिगत तळ आहे
या भूमिगत तळात परवानगीशिवाय प्रवेश करणाऱ्यांना
दिसताच गोळ्या घालण्याचे लष्कराला आदेश
1967 मध्ये चुकून लीक झालेल्या मेमोमुळे हे ठिकाण जगासमोर आलं
2013 मध्ये अमेरिकेच्या इंटेलिजेंस एजेन्सीने अधिकृतपणे हे भूमिगत तळ असल्याचे मान्य केलं
शास्त्रज्ञ या ठिकाणी गुप्तपणे परग्रहावरील एलियन्सवर संशोधन करत असल्याचा संशय
उडत्या तबकड्या (UFOs) आणि एलियन्स हे परग्रहावरच्या जीवनाचा पुरावा मानले जाणारे रहस्यमयी विषय आहेत. आकाशात विचित्र आणि चमकदार आकृत्या दिसल्या की एलियन्सचा संशय व्यक्त होतो. आता एलियन्सच्या अस्तित्वाबाबत खुद्द बराक ओबामांनी केलेल्या दाव्यानं एलीयन्सचं गूढ विश्व पुन्हा एकदा चर्चेत आलंय. आता एरिया 51 मधील रहस्य खरचं बाहेर येणार का? अमेरिका या भूमिगत तळात खरचं एलियन्सवर संशोधन करतंय का? या संशोधनाचा वापर अमेरिका नेमका कशापद्धतीनं करतोय ? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित असले तरी भविष्यात याची उत्तरे नक्की मिळतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.