Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : व्हिडिओ काढण्याच्या नादात ती वाघाला घेऊन खाली बसली, पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

तिने केलेल्या या कृत्याला धाडस म्हणावं की मूर्खपणा असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video : प्राणीप्रेमी नेहमीच आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन काहीना काही करामत करत असतात. प्राण्यांना माणसांचा लळा लागला की, ते देखील माणसाशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर प्रण्यांबरोबरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. अशात आजवर तुम्ही जास्तीत जास्त हिंस्र किंवा विषारी प्रमण्यांमध्ये विष नसलेला मांडूळ साप पळलेलं पाहिलं असेल. मात्र एका महिलेने मोठा कहर केला आहे. ( Latest Tiger Viral Video)

ज्याच्या एका डरकाळीने संपूर्ण जंगलात शांतता पसरते आणि भल्या भल्यांच्या काळजात धडकी भरते अशा वाघाबरोबर या महिलेने फोटो व्हिडिओ शूट केला आहे. आता तुम्हाला वाटेल वाघ तेव्हा पिंजऱ्यात असेल. मात्र तसं नसून हा वाघ चक्क त्या मुलीच्या खांद्यावर बसलाय, आणि मजेत दूध पीत आहे. तरुणीने केलेलं हे धाडस पाहून सगळेच चकित झाले आहेत. तिने केलेल्या या कृत्याला धाडस म्हणावं की मूर्खपणा असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

अनेक व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल व्हावं किंवा मग सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवावं यासाठी काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. या तरुणीने देखील सोशल मीडियावर आपली चर्चा व्हावी किंवा आपण किती हटके आहोत हे दाखवण्यासाठी असं केलं असावं असं काही नेटकरी म्हणत आहेत.

@MsMena Raquel या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला एका मोठ्या मैदानात बसली आहे. इथे तिच्या बरोबर आणखी एक माणूस आहे. महिलेने वाघाला आपल्या खांद्यावर घेतले आहे. बर असं करत असताना महिला चांगलीच घाबरलेली दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर ती किती भयभीत झाली आहे हे समजत आहे. वाघाने महिलेला काही इजा करू नये यासाठी तो माणूस त्याला एका बॉटलमधून दूध पाजत आहे.

अशात थोडं दूध (Milk) पिल्यानंतर वाघ खाली पाहतो तेव्हा त्याला तरुणी दिसते. एका क्षणासाठी असे वाटते की, आता वाघ या तरुणीच्या मानेचा लचका तोडणार. मात्र महीलेचं नशीब चांगलं म्हणून तसं काही होतं नाही. तो त्यक्ती लगेच परत एकदा वाघाला दूध पाजायला सुरुवात करतो. महिलेचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. तिने केलेली करामत पाहून अनेक व्यक्ती तिला ओरडत आहेत. तर काहीजण तिला असे केल्याने जीवित हानी होण्याची शक्यता आहे असे सांगत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spruha Joshi Photos: स्पृहाचं तेजस्वी रूप, हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

राज ठाकरेंनी फटकारल्यानंतर 'पिट्या भाई' दुसरीकडेच फिरले; रमेश परदेशींचा भाजपमध्ये प्रवेश

Crime: पप्पा मला सोडा..., फावडा डोक्यात टाकत मुलाला संपवलं; सुनेच्या प्रेमात वेडा झालेल्या सासऱ्याचं भयंकर कृत्य

कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

Delhi Blast: मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अल-फलाहच्या संस्थापकाला अटक; दिल्ली बॉम्बस्फोटांनंतरची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT