Vande Bharat Express Saam TV
देश विदेश

Vande Bharat: एकाचवेळी लॉन्च होणार 5 वंदे भारत रेल्वे, मुंबई-गोवा हायस्पीड ट्रेन सेवा कधी होणार सुरु? जाणून घ्या

Vande Bharat Express: एकाचवेळी लॉन्च होणार 5 वंदे भारत रेल्वे, मुंबई-गोवा हायस्पीड ट्रेन सेवा कधी होणार सुरु? जाणून घ्या

Satish Kengar

Mumbai Goa Vande Bharat Express: सध्या देशभरात विविध राज्यात वंदे भारत रेलवे धावत आहेत. मात्र अजूनही असे राज्य आहेत जिथे या रेल्वेची सेवा सुरु झाली नाही. ही सेवा या महिन्याच्या अखेरीस देशभरातील सर्वच राज्यात सुरु होणे अपेक्षित होती. मात्र आता अनेक नवीन राज्यांना वंदे भारत रेल्वेचीची भेट मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ जून रोजी पाच नवीन वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवू शकतात. आतापर्यंत एका दिवसात जास्तीत जास्त दोन वंदे भारत रेल्वे लॉन्च करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच एकाच वेळी पाच वंदे भारत ट्रेन लॉन्च होणार आहेत.

ज्या राज्यात नवीन वंदे भारत रेल्वे लॉन्च करण्यात येणार आहेत, त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. यात मुंबई-गोवा वंदे भारत रेल्वेचा समावेश आहे यासोबतच बेंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर या रेल्वे देखील लॉन्च होणार आहे.  (Latest Marathi News)

बिहारसाठी ही पहिली वंदे भारत ट्रेन असेल, जी पाटणा ते रांची दरम्यान धावेल. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात वंदे भारत गाड्या आधीच धावत आहेत. पंतप्रधान मोदी या वंदे भारत रेल्वेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवू शकतात.

तत्पूर्वी २५ मे रोजी पंतप्रधान मोदींनी उद्घाटन समारंभात डेहराडून ते नवी दिल्ली जोडणाऱ्या उत्तराखंडच्या पहिल्या अर्ध-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. १८ मे रोजी पंतप्रधान मोदींनी पुरी आणि हावडा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला होता.

अत्याधुनिक सेमी-हाय-स्पीड ट्रेन अत्याधुनिक प्रवाशांच्या सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये प्रवाशांना सर्व प्रकारचे फायदे मिळतात. कमी पैशात विमानासारख्या सुविधा तर उपलब्ध आहेतच, पण इतर ट्रेनच्या तुलनेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीही कमी वेळ लागतो. ओडिशाच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनच्या लॉन्चिंगनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, पंतप्रधान मोदींनी वंदे भारत या वर्षीच्या जूनपर्यंत जवळपास सर्व राज्यांमध्ये पोहोचले पाहिजे असे लक्ष्य ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT