Germany Shooting  Social media
देश विदेश

Germany Shooting : जर्मनीत बेछूट गोळीबार, ५ जणांचा मृत्यू; दोन हल्लेखोरांना अटक

germany stade shooting near youth centre : जर्मनीतील स्टेड शहरात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला असून, त्यात ५ जणांचा मृ्त्यू झाला आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

जर्मनीच्या उत्तरेकडील स्टेड शहरात बेछूट गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी ही घटना घडली. हल्लेखोरांनी तरुणांच्या एका समूहावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात पाच जण ठार झाले. या प्रकरणी दोन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जर्मनीच्या उत्तरेकडील स्टेड शहरात गोळीबार झाला. पाच जण ठार झाले आहेत. जर्मनीतील वृत्तसंस्था डीपीएने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तरुणांसाठी तयार करण्यात आलेल्या एका केंद्राजवळ हा गोळीबार करण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागात एक मोहीम राबवण्यात येत होती. त्या ठिकाणाला हल्लेखोरांनी लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे तरुणांना आवाहन केले आहे. तुमची सुरक्षितता महत्वाची असून, तात्काळ हा परिसर सोडून इतरत्र सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन पोलिसांनी केले. स्टेड शहरात ही घटना घडली असून, या शहराची लोकसंख्या ५० हजारांच्या आसपास आहे. हॅम्बर्गपासून ते जवळपास ४० किलोमीटरवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात दहीहंडी उत्सवाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती

Maharashtra Politics: शरद पवारांच्या जवळच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, 'ते' वक्तव्य भोवलं; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? त्या बॅनरने राज्यात घडामोडींना वेग

Government Jobs: खूशखबर! वयाची तिशी ओलांडल्यानंतरही मिळेल सरकारी नोकरी; कुठे -कुठे आहे संधी जाणून घ्या

Motha Mangalsutra Design: सणासुदीला आणि लग्नसमारंभात खुलून दिसेल लूक; पाहा 'या' ७ ट्रेंडी मंगळसूत्रांच्या डिझाइन्स

SCROLL FOR NEXT