python viral video saam tv
देश विदेश

Shocking Viral Video: अबब! अजगराने गिळली पाच फूटांची मगर, ही दृष्य तुम्हाला विचलीत करू शकतात

अठरा फूटी अजगराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, कारण...

नरेश शेंडे

अमेरिकाच्या फ्लोरिडात एका अठरा फुटी अजगाराने पाच फुटांची मगर गिळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांनी या अजगराला पकडलं होतं आणि त्यानंतर त्याला मारण्यात आलं. अजगराच्या पोटात भली मोठी मगर सापडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बर्मीज जातीचा अजगर साप या परिसरात घुसल्याने 2022 ऑगस्ट मध्ये फ्लोरिडात पायथनला पकडण्याचं आव्हान होतं. त्यानंतर याच परिसरातून शेकडो अजगरांना हटवण्यात आलं होतं. (Five foot alligator found in python in Florida)

हा विचलीत करणारा व्हिडिओ (Python viral video) जियोसायंटिस्ट रोजी मूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला जवळपास 10 मिलियन लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडिओत अजगराने गिळलेली पाच फूटांची मगर शास्त्रज्ञ बाहेर काढताना दिसत आहेत.

जियोसायंटिस्टने सांगितलं की, बर्मीज अजगरांना फ्लोरिडात मृत्यू देण्याची आवश्यकता आहे. बर्मीज अजगर अमेरिकेत पाळीव साप म्हणून आणण्यात आले होते.1970 च्या दशकापासून त्यांना माणसांनी एवरग्लेड्स मध्ये सोडायला सुरुवात केली. तेव्हापासून ही एक धोकायदायक बाब बनली आहे. हे साप पशु, पक्षी, हरणांचा शिकार करतात. फ्लोरिडात बर्मीज अजगरांची संख्या जवळपास एक लाखांपर्यत असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : मन उधाण वाऱ्याचे...; पक्ष्यांचा किलबिलाट अन् सूर्यास्ताचे देखणे रूप, अलिबागजवळ लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये संतांच्या पादुकांचे रिंगण सोहळा

Hair Wash Tips: दोन, तीन की दररोज...; आठवड्यातून नक्की किती वेळा केस धुवावे

Hairstyles For Long Face Women: नेहमीच्या हेअर स्टाइल्स विसरा; ट्राय करा 'या' आकर्षक अन् युनिक Hair Styles, तुम्हीच दिसाल सुंदर

Sunday Horoscope: पैशाची तंगी भासेल, 'या' राशीच्या लोकांनी डोकं ठेवा शांत; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT