Omicron saam media
देश विदेश

आंध्र प्रदेशात पहिला, कर्नाटकात तिसरा ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला

नागरिकांनी काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.

साम न्यूज नेटवर्क

सातारा : आंध्र प्रदेश (andhra pradesh) येथे पहिला तसेच कर्नाटक (karnataka) राज्यात तिसरा ओमिक्रॉनचा (omicron) रुग्ण आढळल्याची माहिती दाेन्ही राज्यातील आराेग्य विभागांनी रविवारी दिली. कोविड- १९ च्या ओमिक्रॉन रुग्ण आढळत असले तरी नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन कर्नाटक आणि आंध्रप्रेदश राज्यातील आराेग्य विभागांनी करुन मास्कचा वापर करावा असे सूचित केले आहे.

आंध्र प्रदेशात आजपर्यंत एकूण १५ परदेशी प्रवाशांना कोविड- १९ ची लागण झाल्याची माहिती त्यांची RT-PCR चाचणी केल्यानंतर पुढे आली आहे. या सर्व १५ संशयित रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (genome sequencing) पाठवण्यात आले हाेते. त्यापैकी एकास ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. याेग्य ती काळजी घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असा सल्ला आंध्र प्रदेशच्या आरोग्य विभागाने दिला आहे. नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, मास्क परिधान करावा आणि नियमितपणे हात स्वच्छ धुवावेत असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.

दरम्यान कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉ. सुधाकर यांनी ट्विट करुन दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेला ३४ वर्षीय व्यक्तीस ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच प्राथमिक आणि १५ दुय्यम संपर्क शोधून काढले आहेत आणि त्यांचे नमुने घेत चाचणीसाठी पाठवले आहेत असे हे मंत्री सुधाकर यांनी नमूद केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

१४ हजार कोटींच्या कोस्टल रोडवर काय घडलं? तब्बल 3 किमी वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT