Delhi Police News Saam tv
देश विदेश

New Criminal Laws : देशात नवे फौजदारी कायदे लागू होताच दिल्लीत पहिल्या गुन्ह्याची नोंद; नेमकं काय आहे प्रकरण?

New Criminal Laws update : शात नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. नवी फौजदारी कायदे लागू होताच दिल्लीत पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : आजपासून देशभरात नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत. या नव्या फौजदारी कायद्यानुसार पहिला गुन्हा नोंद झाला आहे. दिल्लीतील कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये हा पहिला गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक यांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी कार्तिक मीणा यांनी ही पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी ते नवी दिल्लीतील रेल्वे स्टेशन फूट ब्रिजजवळ डीलक्स शौचालयाजवळ पोहोचले. त्यावेळी एक जण रस्त्यावर पाणी, सिगारेट, ध्रुमपानाचे साहित्यांची विक्री करत होता. या विक्रेत्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती.

काय आहे नेमकं प्रकरण ?

दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 नुसार देशात पाहिला गुन्हा नोंदवला आहे. दिल्लीतील कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवला आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या फूट ओव्हर ब्रिजखाली अडथळा आणून विक्री केल्याबद्दल भारतीय न्याय संहिताच्या 285 अन्वये रस्त्यावरील विक्रेत्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आता नव्या फौजदारी कायद्यानुसार पोलिसांनी एफआयआर वेगळ्या पद्धतीने लिहिली आहे. पोलिसांनी कलम बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. नव्या फौजदारीनुसार नोंदवलेल्या एफआयआरची प्रत उपलब्ध आहे. तसेच हा गुन्हा हा भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, नव्या फौजदारी कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यासाठी २५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तसेच, देशात सोमवारपासून नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. यामुळे ब्रिटिशाकाळातील फौजदारी कायदे रद्द करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT