Firing on LoC  
देश विदेश

Ceasefire On LoC: एलओसीवर गोळीबार; भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, लष्कराच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या ४ ते ५ जवानांचा मृत्यू

Firing on LoC : पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करी चौक्यांवर केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत पाकिस्तानच्या ४-५ जवानांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

पाकिस्तानच्या सैन्याने बालाकोट सेक्टरमध्ये भारताच्या लष्करांच्या चार चौक्यांवर गोळीबार केला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारीला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय. अनेक जवान जखमी झालेत तर ४ ते ५ सैनिकांचा मृत्यू झालाय.

दरम्यान गेल्या एका आठवड्यापासून एलओसीवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिक सतर्क झाले असून पाकिस्तानचा प्रत्येक डाव भारतीय सैनिकांकडून हाणून पाडला जात आहे. पाकिस्तानकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याबाबत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले, आज जम्मूमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत.

या बैठकीत लेफ्टनंट गव्हर्नर, जम्मू-काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात यांच्यासह जम्मू-काश्मीर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, आयजीपी जम्मू उपस्थित राहणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले, ज्यात मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिक जखमी झालेत. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एका दिवसापूर्वी जम्मू जिल्ह्यातील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एका कॅप्टनसह दोन भारतीय लष्कराच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress: काँग्रेसच्या बड्या नेत्याविरोधात अटक वॉरंट जारी, राजकीय वर्तुळात खळबळ; नेमकं प्रकरण काय?

Toll Tax Rule: वाहनचालकांना दिलासा! 'या' एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली बंद, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: पुण्याच्या खेड तालुक्यातील गुळाणी घाटात खाजगी शाळेची बस आणि डंपरचा समोरचा धडक

Vastu Tips: घरात लावा 'या' पक्षांचे फोटो, उजळेल तुमचं नशीब

Viral Video: विना तिकीट लोकल प्रवास, टीसीनं अडवताच तरुणाने ठोकली धूम, VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

SCROLL FOR NEXT