firecrackers factory explosion in Krishnagiri  SAAM TV
देश विदेश

Tamil Nadu News : कृष्णागिरीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ३ महिलांसह ८ मृत्युमुखी

firecrackers factory explosion in Krishnagiri : तामिळनाडूमधील कृष्णागिरी जिल्ह्यातील एक फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला.

Nandkumar Joshi

firecrackers factory explosion : तामिळनाडूमधील कृष्णागिरी जिल्ह्यातील एक फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली. अनेक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट कसा झाला, याबाबत पोलिसांना अद्याप ठोस माहिती मिळाली नाही. (Latest Marathi News)

तामिळनाडूतील कृष्णागिरी जिल्ह्यात शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. येथील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की, जवळच असलेल्या एका हॉटेलच्या इमारतीचा काही भागही कोसळला.

कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटामुळे नजीकच्या चार इतर इमारतींचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या इमारतींमध्ये काही लोक अडकून पडले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या १२ जणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे बंब आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अडकून पडलेल्या अनेकांना बाहेर काढण्यासाठी अनेक तास प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

कृष्णागिरी पोलीस अधीक्षक सरोज कुमार ठाकोर यांनी सांगितले की, पझायापेट्टई परिसरात रवी नावाच्या एका व्यक्तीचा फटाक्यांचा कारखाना आहे. या कारखान्यात शनिवारी सकाळी स्फोट झाला. किमान आठ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT