फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही: सर्वोच्च न्यायालय Saam Tv
देश विदेश

फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही: सर्वोच्च न्यायालय

पश्चिम बंगालमध्ये कालीपूजा, दिवाळी आणि अन्य सणांमध्ये यंदा फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : देशात फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही. परंतु, त्यांचा गैरवापर रोखण्याकरिता यंत्रणा अधिक मजबूत करावी लागणार आहे, असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पश्चिम बंगालमध्ये कालीपूजा, दिवाळी आणि अन्य सणांमध्ये यंदा फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

न्या. ए. एम. खानवीलकर आणि अजय रस्तोगी यांच्या विशेष खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. मात्र, प्रतिबंधित फटाके आणि संबंधित वस्तू राज्यात आयात केले जाणार नाही, याची प्रवेशद्वांवरच खात्री करण्याचे निर्देश पश्चिम बंगाल सरकारला देण्यात आला आहे. दिवाळीच्या सुट्टी दरम्यान प्रकरणांवर सुनावणीसाठी या खंडपीठाची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वायुप्रदूषणाला आळा घालण्याकरिता राज्यात सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्री, वापर आणि खरेदीवर बंदी घालणाऱ्या उच्च न्यायालयाच्या २९ ऑक्टोबर दिवशीच्या आदेशा विरोधातील याचिकांवर सुनावणीवेळी खंडपीठाने हा निर्देश देण्यात आला आहे.

या वर्षी कालीपूजा, दिवाळी, छठपूजा, जगधात्री पूजा, गुरूनानक जयंती आणि ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर केले जाणार नाही याची काळजी राज्याने घ्यावी, असे उच्च न्यायालयाने आदेशात सांगितले होते. तसेच सण- उत्सवांत केवळ मेण किंवा तेलाचे दिवेच वापरावेत, असे त्यात देखील नमूद करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संतापजनक! रात्री रस्त्यावर अर्धनग्न फिरत होता तरूण; फुटपाथवरील भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार, सीसीटीव्हीत घटना कैद

Mouth Cancer: सिगारेट न ओढणाऱ्यांमध्येही वाढतोय तोंडाचा कॅन्सर; तरूणांनी या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करूच नये

Rukmini Vasanth Video: प्रसिद्ध अभिनेत्रीचा बिकिनीतील 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; व्हिडिओचं सत्य आलं समोर

Maharashtra News Live Update: जळगावात डिझेल टंचाईमुळे टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय आर्थिक संकटात

Insomnia Relief: रात्री झोप येईना? 'या' ५ चुका टाळा मग येईल गाढ झोप

SCROLL FOR NEXT