अखेर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव  Saam Tv
देश विदेश

अखेर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

१८ जुलै पासून देशभरात पेट्रोलचे दर स्थिर होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महिनाभर भाव स्थिर राहिल्यानंतर आता इंधनाच्या Fuel दरात किंचित कपात झाली आहे. रविवारी डिझेल Disel पाठोपाठ पेट्रोलच्या Petrol दरात देखील घसरण झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या बाजारभावानुसार पेट्रोलच्या किंमतीत २० पैशांची कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत १० ते २० पैशांची घसरण झाली आहे. पेट्रोलच्या दरात तब्बल महिनाभरानंतर बदल झाले आहे. १८ जुलै पासून देशभरात पेट्रोलचे दर स्थिर होता.

हे देखील पहा -

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशभरात शनिवारी स्थिर होत्या. तत्पूर्वी तीन दिवसांत डिझेल ६० पैशांनी स्वस्त झाले होते. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत प्रतीलिटर डिझेलचे दर ९६.६४ रुपये झाले आहेत. तर पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०७.६६ इतके रुपये आहे. तर दिल्लीमध्ये प्रतिलिटर पेट्रोलसाठी १०१.७४ तर एका लिटर डिझेलसाठी ८९.०७ रुपये मोजावे लागत आहेत. दररोज, सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये बदल होत असतो. त्यानुसार सकाळी सहा वाजता हे नवे दर लागू करण्यात येतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT